
काँग्रसने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपाने आज काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जाहीर माफ मागावी अशी मागणी केली. अधिर रंजन चौधरी यांनी मुर्मू यांना ‘राष्ट्रपत्नी’ म्हटल्यावरुन हा वाद निर्माण झाला आहे. नेमकं काय घडलं आणि कोण काय म्हणालं जाणून घेऊयात १० महत्वाच्या मुद्द्यांच्याआधारे…
१) केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोनिया यांधींवर टीका करताना त्यांनी या प्रकरणी माफी मागावी अशी मागणी केली. “देशातील सर्वोच्च संवैधानिक पदावर असणाऱ्या महिलेचा अपमान करण्याची परवागनी सोनिया गांधींनी दिली,” असा आरोप इराणी यांनी लोकसभेमध्ये बोलताना केला. तसेच त्यांनी सोनिया गांधी या “आदिवासीविरोधी, दलितविरोधी आणि महिलाविरोधी” असल्याचा आरोप केला.
२) त्याचप्रमाणे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनीही या विषयावर आक्षेप घेतला. करोनावर मात करुन सभागृहाच्या कारभारामध्ये प्रत्यक्षात सहभागी झालेल्या निर्मला यांनी हे वक्तव्य महिलांचं अपमान करणारं असल्याचं म्हटलं. जाणून बुजून हे वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप निर्मला यांनी केला. तसेच पक्षाच्यावतीने सोनिया गांधींनी माफी मागावी असंही निर्मला यांनी म्हटलं.
३) “स्वत: एक महिला असूनही आपल्या नेत्याला अशाप्रकारे बोलण्याची परवानगी देणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी माफी मागावी अशी मी मागणी करते. सोनिया गांधींनी देशासमोर येऊन देशाच्या राष्ट्रपतींचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागावी,” असं निर्मला यांनी म्हटलंय.
४) अधिर रंजन चौधरी यांनी या प्रकरणात माफी मागितली असून आपली जीभ घसरल्याने चूकून आपण तो शब्द वापरल्याचं म्हटलंय. “भाजपा राईचा पर्वत करत आहे,” अशी टीकाही चौधरी यांनी केली. जीएसटी, अग्निपथ योजना, बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या विषयांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी भाजपा हे करत असल्याचा आरोप चौधरी यांनी केलाय.
५) “भारताच्या सर्वोच्च पदावर कोणीही असो अगदी तो ब्राह्मण असो किंवा आदिवासी असो ते आमच्यासाठी राष्ट्रपतीच आहेत. आमचा सन्मान हा त्या पदासाठी आहे. काल आम्ही विजय चौकामध्ये आंदोलन करत असताना पत्रकाराने आम्हाला कुठे जायचं आहे. त्यावर मी त्यांना आम्ही राष्ट्रपतीभवनाकडे जातोय असं सांगितलं. त्याचवेळी मी एकदा चुकून “राष्ट्रपती” म्हणाले. पत्रकाराने मला ते सांगितलं. त्यावर मी ते चुकून म्हटलं असून तुम्ही ते प्रदर्शित न केल्यास बरं होईल असंही म्हटलं. यावरुन त्यांनी (भाजपाने) गोंधळ सुरु केलाय. मी केवळ एक शब्द बोलताना चूक केली,” असं चौधरी यांनी ट्विटरवरुन पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये खुलासा करताना म्हटलंय.
६) या प्रकरणासंदर्भात एनडीटीव्हीशी बोलताना सोनिया गांधी यांनी “घडलेल्या गोष्टीबद्दल अधिर रंजन चौधरींनी माफी मागितली आहे,” अशी प्रतिक्रिया नोंदवलीय.
७) अधिर रंजन चौधरी हे लोकसभेमधील काँग्रेसचे नेते आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हा शब्दप्रयोग केला होता. वेगवेगळ्या मागण्यांसाठी सुरु असणाऱ्या काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलेलं.
८) राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीएने) मुर्मू यांचं नावाची घोषणा केल्यापासूनच द्वेषपूर्ण भाषेमध्ये काँग्रेस मुर्मू यांना लक्ष्य करत असल्याचा आरोप इराणी यांनी केलाय. इराणी यांनी मुर्म यांना काँग्रेसच्या नेत्यांनी ‘बोलकी बाहुली’ आणि ‘वाईटाचं प्रतिक’ असंही म्हटल्याचा आरोप केलाय.
९) “भारताच्या राष्ट्रपतींचा अशा प्रकारे उल्लेख करणे हे केवळ त्यांच्या घटनात्मक पदालाच नाही तर त्या ज्या समृद्ध आदिवासी वारशाचे प्रतिनिधित्व करत आहे त्यालाही अपमानित करण्यासारखं असल्याची जाणीव काँँग्रेस नेत्यांना आहे,” असंही इराणी म्हणाल्या.
१०) भाजपाने या विषयावरुन घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यामुळे निर्माण झालेल्या गोंधळामुळे लोकसभेचं कामकाज १२ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलेलं.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
विडियो गॅलेरी

देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले


























Subscribe to my channel
