कल्याण : राज्यात कोळसा टंचाई आणि उष्णतेच्या लाटेमुळे वीजेच्या मागणीत वाढ झाल्यामुळे वीजग्राहकांना भारनियमनाची झळ सोसावी लागत आहे. अदानी पॉवर्स कंपनीने केलेल्या कमी वीजपुरवठ्यामुळे आणि केंद्र सरकारच्या नियोजनाच्या चुकांमुळे वीज टंचाई झाली. असा आरोप उर्जामंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केला होता. तसंच भारनियमन कधीपर्यंच राहील याबाबत सध्या काही सांगता येणार नाही, असंही राऊत यांनी म्हटलं होतं. त्यामुळे राज्यात भारनियमनाचं संकट आणखी गडद होणार का ? असा प्रश्न वीजग्राहकांना पडला होता. या पार्श्वभूमीवर कल्याणमध्ये शिवसेनेनं महावितरण कार्यालयात लाईट, पंखे बंद करुन मेणबत्त्या पेटवत अनोख आंदोलन केलं. मलंगड भागात सुरु असलेल्या अघोषीत भारनियमनामुळं शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी महावितरणच्या तेजश्री कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांनी महावितरण अधिकाऱ्यांच्या दालनात लाईट, पंखे बंद करून मेणबत्त्या पेटवत अनोखं आंदोलन केलं.
दरम्यान राज्यात सुरु असलेल्या वीजटंचाईवर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी राऊत म्हणाले, माध्यमांशी बोलताना राऊत पुढे म्हणाले, देशात वीजेची टंचाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जवळपास २७ राज्यांमध्ये लोडशेडींग सुरु झालं. त्यापैकी ९ राज्ये मोठे राज्ये आहेत. महाराष्ट्र सुध्दा यापासून वंचीत राहिलेला नाही. उष्णतेचं तापमान एप्रिलमध्ये वाढायच्या ऐवजी फेब्रुवारीतंच वाढलं आहे. हे त्त्यामागचं कारण आहे. त्यानंतर कोविडमधून सर्व फ्री झाले आणि निर्बंधही हटवले. त्यानंतर व्यापार, उद्योगधंदे १०० टक्के सरु झाल्यानं त्याचा परिणाम वीजेवरही झाला. सप्टेंबर मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळं कोळशाच्या खाणीत पाणी शिरलं.तसंच कोळसा टंचाईवर लोकांनी आंदोलनही केलं. डिझेलचे दर वाढले. त्यामुळे कोळसा खाणीतून रेल्वेने कोळसा आणण्यात तफावत झाली. केंद्रिय कोळसा मंत्रालयाने सुद्धा रेल्वे मंत्रालयाकडे बोटं दाखवलं.
केंद्र सरकारच्या नियोजनाच्या चुकांमुळे ही वीज टंचाई झाली. अचानकपणे अदानी पॉवर्सने तिरोडा प्लॅंटमधला थोडासा पुरवठा बंद केला. ३१०० मेगा वॉटचा पीपीए करार आहे. पण त्यांनी १७६५ मेगावॅटचा सप्लाय केला. जेएसडब्लूकडून आम्हाला १०० मेगा वॉट वीज मिळायची ती सुद्धा मिळाली नाही. कारण त्यांचा प्लॅंट बंद झाला. खुल्या बाजारात वीज उपलब्ध नाही. वीज कंपन्या बंद आहेत त्यामुळे आमच्यावर ताण राहणार आहे, नागरिकांना विनंती आहे की, विजेच्या वापरात काटकसर करावी. भारनियमनाचं शेड्यूल वृत्तपत्रात, मेसेजवर आणि वाट्सअॅपवर नागरिकांना दिलं जाईल. १५०० मेगावॉट वीज उपलब्ध झाल्यावर आम्ही भारनियमन बंद करु. असंही नितीन राऊत यावेळी म्हणाले.
शहर
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- भारत-नेपाल सीमेवर नागरिकांना मोठा दिलासा! बालेन शाह सरकारचा मोठा निर्णय; भारतातून आणणाऱ्या सामानावरील शुल्क सवलत पाच पटीने वाढवली!
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
महाराष्ट्र
- नागपूर दर्गा धर्मांतर प्रकरण: तरुणीला बुरखा आणि कलमा वाचायला लावून बळजबरीने धर्मांतराचा प्रयत्न
- ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; चांदी तब्बल ६,००० रुपयांनी स्वस्त!
- शिल्पा शिंदेच्या 'खोट्या' कबुलीजबाबावर हिना खानचा संताप; पंतप्रधान मोदींकडे केली उपरोधिक मागणी!
- भोंदूगिरीचा पर्दाफाश! अघोरी पूजा आणि मृत्यूची भीती दाखवून 'भोंदू कमलेश'ने राज्यभरातील भाविकांना लुटले; पोलिसांची दोन पथके रवाना!
गुन्हा
- मलबार हिल पोलिसांत गुन्हा! सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपिकाकडून विवाहितेची १५ लाखांना फसवणूक!
- अमरावती: "तू आम्हाला दारू पाजतो का?"; नकार देताच वाद झाला अन् दगडाने ठेचून तरुणाचा खून;
- पुण्यात रक्तरंजित थरार! आयटीआयच्या विद्यार्थ्याची झोपेत असताना वर्गमित्राकडून निर्घृण हत्या
- रायगड: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा जीव घेतला! अलिबागमध्ये ८५ वर्षीय महिलेची हत्या; मृतदेह आंबेनळी घाटात फेकला
राजकीय
- तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी खळबळ! २३ खासदार बंडखोर गटाच्या संपर्कात, ममता बॅनर्जींच्या अडचणीत वाढ?
- कर्नाटकात राजकीय भूकंप: मंत्री रामलिंगा रेड्डींचा राजीनामा; खातेवाटपावरून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप!
- छगन भुजबळ दिल्लीला जाणार? राज्यसभेसाठी नाव निश्चित होण्याची शक्यता, समीर भुजबळांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाची चर्चा!
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा
इतर
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
- पुणे: सामाजिक बांधिलकी जपत 'ONP Hospitals'तर्फे ७ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन!
- अन्न व औषध प्रशासनाचा बीडमध्ये धडाका: तुकाराम मुंढेंच्या आदेशानुसार भेसळयुक्त पदार्थ आणि गुटखा जप्त
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
देश विदेश
- खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!खिसा रिकामा, महागाई जोरात! २००० ते २०२६ दरम्यान जीवनावश्यक वस्तू ५ ते ६ पटीने महागल्या; पेट्रोल अन् दुधाचे दर ऐकून चक्रावाल!
- गरिबीवर मात! ई-रिक्षा चालकाच्या मुलाने क्रॅक केली JEE Advanced परीक्षा; आयआयटीत (IIT) जाणारा ठरला गावातील पहिलाच तरुण!
- नोएडा शहरासाठी आजची सकाळ अत्यंत भीतीदायक ठरली, कारण शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी आगीच्या भीषण घटना घडल्या आहेत.
- पश्चिम बंगाल: तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट! 'ममता बॅनर्जी आता आमच्या नेत्या नाहीत', बंडखोर आमदारांचा खळबळजनक दावा

























Subscribe to my channel


