औरंगाबाद : शेतकऱ्याचा खून करणाऱ्या चौघांना अटक

]

औरंगाबाद : गायरान जमिनीच्या वादातून दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घे म्हणत वृद्ध शेतकऱ्याच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीचे घाव घालून गुरुवारी (ता.१८) निर्घृण खून करण्यात आला होता. जनार्दन कोंडिबा कसारे (५६, रा. साईनगर, पिसादेवी) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणातील सहापैकी चार आरोपींना ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस उपाधीक्षक जयदत्त भवर यांच्या पथकासह चिकलठाणा पोलिसांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

शिवाजी महादू औताडे, गिरिजा बाळू औताडे, महादू गंगाराम औताडे आणि भरत महादू औताडे (रा. सर्व हर्सूल) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. बाळू महादू औताडे आणि बबन निवृत्ती रोडे हे दोघे आरोपी सध्या फरार आहेत.

पिसादेवी परिसरात नऊ एकर गायरान जमीन आहे. तब्बल ३५ वर्षांपासून नऊ एकरांपैकी आठ एकर जमीन जनार्दन कसत होते. तसेच एक एकर जमीन ही महादू गंगाराम औताडे याच्या ताब्यात आहे. या जमिनीवरूनच २००८ मध्ये आणि त्यानंतर कसारे आणि औताडे कुटुंबामध्ये वाद झाला होता. तेव्हा या प्रकरणात औताडे विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जनार्दन कसारे यांच्यावर १८ ऑगस्ट रोजी दुपारी कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला, त्यानंतर त्यांना तातडीने रिक्षाने घाटीत दाखल केले होते. रात्री नऊ वाजेदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनार्दन यांना मृत घोषित केल्याचे डीवायएसपी तथा तपास अधिकारी जयदत्त भवर यांनी सांगितले. सहाही आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत जनार्दन कसारे यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कसारे कुटुंबीयांसह नातेवाईक, विविध संघटनांनी घेतला होता. अखेर काही मागण्या मान्य केल्याने कसारे यांचा मृतदेह दुपारी सव्वातीन वाजेदरम्यान स्वीकारला. मृतदेहावर साडेचार वाजेदरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत जनार्दन यांना दोन मुले आणि एक विवाहित मुलगी आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply