औरंगाबाद : राज ठाकरेंच्या दौऱ्याला ग्रहण; ताफ्यातील गाड्यांचा पुन्हा अपघात

औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यात दुसरा अपघात घडला आहे. औरंगाबाद जवळील वाळूज येथे हा अपघात घडल्याची माहिती आहे. याआधी घोडेगाव येथे काही वेळांपूर्वी ताफ्यातील गाड्यांचा अपघात घडला होता. त्यामध्ये दोन गाड्यांचं नुकसान झालं होतं.

वाळूज येथे पुण्याच्या शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या गाडीलाही अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात १२ गाड्यांच नुकसान झालं आहे. त्यांच्या या दौऱ्यातील अपघाताच्या मालिकेनंतर राज ठाकरे सुखरुपपणे औरंगाबादेत दाखल झाले आहेत.

औरंगाबाद येथील उद्याच्या सभेसाठी ते जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाड्यांचा दुसऱ्यांदा अपघात घडला आहे. पहिला अपघात अहमदनगर येथील घोडेगाव येथे घडला होता. त्यावेळी तीन गाड्या एकमेकांना पाठीमागून धडकल्या होत्या ज्यात केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांच्या गाडीचे नुसकान झाले होते. या दोन्ही अपघातात कुणी जखमी झाल्याचं वृत्त अद्याप समोर आलं नाही. वाळूज येथे घडलेल्या अपघातात एअर बॅग्समुळे कुणालाही दुखापत झाली नाही असं सांगण्यात आलं आहे.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे औरंगाबाद येथे उद्या जाहीर सभा घेणार आहेत. सभेसाठी ते आज सकाळीच पुरोहितांकडून पुजापाठ करून निघाले होते. वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी त्यांचा ताफा थांबला होता. त्यानंतरच्या प्रवासात अहमदनगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे अपघात झाला होता. या अपघातात दोन मराठी कलाकारांच्या गाड्यांचं नुकसान झालं होतं.

पुढच्या प्रवासात औरंगाबाद जवळील वाळूज येथे दुसरा अपघात झाला असून पुण्याचे मनसे अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या गाडीसह १२ गाड्यांचं या अपघातात नुकसान झालं आहे. या अपघाताच्या मालिकेतही मनसे अध्यक्ष औरंगाबाद शहरात सुखरुप दाखल झाले आहेत. आता त्यांच्या उद्याच्या सभेवर सर्वांचे लक्ष लागलेले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply