औरंगाबाद : मुंबई, दिल्लीला आता सकाळीही विमानसेवा

औरंगाबाद : शहरातून मुंबई आणि दिल्लीसाठी सकाळच्या सत्रात विमानसेवा नव्हती. त्यामुळे रात्री मुंबईत पोचल्यावर तेथून कनेक्टिंग फ्लाइटसाठी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत प्रतीक्षा करावी लागत होती. आता मात्र, २० ऑगस्टपासून सकाळच्या वेळेत दिल्ली आणि मुंबईसाठी विमानसेवा सुरू होत आहे.

मुंबईहून औरंगाबादसाठी सकाळी ७ वाजता एअर इंडियाचे विमान निघून ते औरंगाबादला ८.१० वाजता औरंगाबादेत पोचणार आहे. औरंगाबादहून पुन्हा मुंबईकडे ८.५० वाजता हे विमान उड्डाण करेल व मुंबईला सकाळी १० वाजता पोचेल. त्याचप्रमाणे दिल्लीहून औरंगाबादसाठी पहाटे ५.२० वाजता एअर इंडियाचे विमान निघेल. औरंगाबादला ७.१५ वाजता पोचता येईल. आणि औरंगाबादहून दिल्लीकडे सकाळी ७.५० वाजता झेपावणारे विमान दिल्लीत ९.४५ वाजता पोचवेल.

शहरातील व्यावसायिक, उद्योजकांची अनेक दिवसांपासूनीच मागणी होती. या निमित्ताने मुंबई आणि दिल्लीला जाण्यासाठी सोय झाली आहे. सकाळच्या वेळेत मुंबईत पोचता आल्याने देशविदेशात कनेक्टिंग फ्लाइट घेणे सोपे होईल.
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply