औरंगाबाद:  मला महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायच्या नाहीत: राज ठाकरे

औरंगाबाद: मला महाराष्ट्रात कुठेही दंगली घडवायच्या नाहीत. लाऊडस्पीकर हा सामाजिक विषय आहे. त्याचा तुम्ही धार्मिक विषय करु नका. सगळे लाऊडस्पीकर अनधिकृत आहेत. तुम्ही आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकाला दिला.

मनसे (MNS) अध्यक्ष राज यांची आज औरंगाबादमध्ये सभा होत आहे. पुण्यातून हनुमान जयंतीच्या दिवशी राज ठाकरेंनी दोन घोषणा केल्या त्यापैकी एक होती औरंगाबादची सभा ठाकरे . गुढीपाडव्याच्या सभेला राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील राजकीय वातावरण तापले होते. त्यानंतर ठाण्यातील उत्तरसभेमध्ये राज ठाकरे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. संबंध राज्यातून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला आलेले आहेत.

कोणाच्या सणामध्ये मला विष कालवायचे नाही, पण चार तारखेपासून मी ऐकणार नाही. ४ तारखेनंतर तिथे तिथे भोंगे लागतील तिथे हनुमान चालिसा लावणार, असंही ठाकरे म्हणाले. सरळ मार्गाने कोण ऐकत नसतील तर हेच करावे लागेल, असंही ठाकरे म्हणाले.

मी हा मुद्दा अचानक काढलेला नाही. माझा कोणत्याही जातीला विरोध नाही. हा सामाजिक विषय आहे. हा विषय धार्मिक नाही. त्यामुळे धार्मिक विषय करु नका. महाराष्ट्रातील शांतता आम्हाला बिघडवायची नाही. उत्तर प्रदेशमधील लाऊडस्पीकर उतरवले जाऊ शकतात, मग आपल्या राज्यात का उतरवले जात नाहीत, असंही राज ठाकरे म्हणाले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply