एसटी कामगारांच्या काही मागण्या मान्य परंतु विलिनीकरण नाहीच

मुंबादेवी : न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार एसटी कामगारांच्या  काही मागण्या मान्य झाल्याने गुरुवारी आझाद मैदानात  त्यांनी विजयोत्सव साजरा केला. कामगारांनी आपले नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते  यांचे ढोल-ताशांच्या गजरात गुलाल उधळून राजेशाही थाटात निर्णयाचे स्वागत केले. ‘एक मराठा... लाख मराठा’, ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी आझाद मैदान दणाणून गेले होते. जवळपास पाच हजार कामगार जल्लोषात सहभागी झाले होते.

पाच महिन्यांपासून विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत असलेल्या एसटी कामगारांच्या काही मागण्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने गुरुवारी मान्य केल्या. एसटी कामगारांना पेन्शन, ग्रॅच्युईटी आणि बोनस देण्याचे सरकारने जाहीर केले. २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे. ॲड. गुणरत्न सदावर्ते म्हणाले, की न्यायालयात निकालाचे वाचन सुरू असून त्याची प्रत मिळाल्याशिवाय आंदोलनाबाबत मी काहीही बोलणार नाही.

निकालपत्रात एसटीच्या विलगीकरणाबाबत स्पष्टपणे नमूद करीपर्यंत एकही एसटी कामगार कामावर हजर होणार नाही. सरकारने दिलेली डेडलाईन आम्ही पाळत नाही. आम्हाला आदेश देणारे हे कोण, असा सवालही त्यांनी केला. निकालपत्र वाचल्याशिवाय एकही कामगार आझाद मैदान सोडणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply