डेटिंगचे बिल कोणी भरावे, हा वाद स्वतः डेटिंगइतकाच जुना आहे. 1980 च्या दशकात जेव्हा मी अविवाहित तरुण होतो तेव्हा मित्रांमधील या वादाच्या केंद्रस्थानी मी असायचो. माझे सहकारी त्यांच्या रोमँटिक भेटींच्या खर्चासाठी माझ्याकडून पैसे उधार घ्यायचे. मी क्वचितच नकार द्यायचो, पण ‘सोल्जर पेमेंट’ची सूचना देण्याची संधीही सोडायचो नाही-म्हणजेच प्रत्येकाने स्वतःच्या खाण्याचा खर्च स्वतः देणे. माझ्या या सूचनेला लगेच विरोध व्हायचा. ‘अशा विचाराने तुझे कधीच लग्न होणार नाही’ असा इशारा ते मला द्यायचे. महिन्याच्या शेवटी आम्ही एका प्रिंटिंग प्रेसच्या तुटलेल्या बाकांवर बसून ‘कटिंग चहा’ प्यायचो. कारण आम्हाला तेव्हा तेवढेच परवडायचे. तेव्हा ते मला प्रेमसंबंधांचे ‘ज्ञान’ द्यायचे. त्यामागचे लॉजिक साधे असायचे. मुख्यतः पुरुषच कमावते असतात आणि भविष्यात घर चालवणारे असतात. डेटचे बिल भरून पुरुष आपली क्षमता सिद्ध करतो की तो आता लग्नासाठी तयार आहे, असा त्यांचा तर्क असे. आता 2026 मध्ये येऊ. परिस्थिती खूप बदलली आहे तरीही आश्चर्याची गोष्ट म्हणजे मूळ अपेक्षा तिथेच अडकलेल्या आहेत. आज महिला अधिक शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आहेत. अनेक महिला (सर्व नाही) पारंपरिक कौटुंबिक दबावातून मुक्त होऊन स्वतःच्या हिमतीवर काम करत आहेत. तरीही पहिल्या डेटचे बिल पुरुषानेच भरावे हा रिवाज कायम आहे. विशेष म्हणजे पुरुषाच्या ‘घर चालवणाऱ्या’ दर्जाची बरोबरी आता महिलांच्या ‘ब्यूटी टॅक्स’शी केली जाऊ लागली आहे. ‘ब्यूटी टॅक्स’ म्हणजे समाजाच्या आधुनिक सौंदर्य मानकांना पूर्ण करण्यासाठी महिला जो खर्च करतात तो वेगाने वाढत आहे. प्रोफेशनल मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरपासून नियमित वॅक्सिंग आणि हेअर स्टायलिंगपर्यंत स्वतःला प्रेझेंटेबल ठेवण्यासाठी येणारा हा ‘रनिंग कॉस्ट’ हे एक कारण सांगितले जाते की, पुरुषाने बिल का भरावे? या दृष्टिकोनातून पाहिले तर महिला हॉटेलमध्ये पोहोचण्यापूर्वीच त्यांचा आर्थिक वाटा खर्च करून झालेला असतो. अलीकडील सर्वेक्षणांनुसार हा विचार आणि पारंपरिक पुरुषी शिष्टाचार मिळून हे ठरवतात की डेटिंग आजही बऱ्याच अंशी लिंग-आधारित पॅटर्नवरच चालते. यामागचे मानसशास्त्र मनोरंजक आहे. एका सर्वेक्षणानुसार, 30% महिला पुरुषांनी बिल भरण्याला ‘इन्टेंशनल डेटिंग’चा संकेत मानतात. त्यांच्यासाठी हे पैशाचे प्रदर्शन नसून पुरुषाने त्यांची निवड केली आहे आणि तो नात्यात गुंतवणूक करण्यास तयार आहे, असा संदेश असतो. दुसरीकडे, 17% महिलांचा असा तर्क आहे की जर नात्यात गांभीर्य असेल तर बिल वाटून घेणे हा उत्तम मार्ग आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे 67% पुरुष अजूनही असे मानतात की सामाजिक शिष्टाचारानुसार पहिल्या भेटीचा खर्च त्यांनीच केला पाहिजे, मग त्यांचे उत्पन्न समोरच्या महिलेपेक्षा कमी का असेना. यावरून मला माझ्या आयुष्यातील एक वैयक्तिक किस्सा आठवला. एका छोट्या काळात माझे उत्पन्न माझ्या पत्नीपेक्षा 250 रुपयांनी कमी होते. मला घरी जेवण करणे आणि काटकसर आवडायची, ज्याचा माझ्या कमाईशी काही संबंध नव्हता. पण पत्नीला महिन्यातून किमान एकदा बाहेर जाणे आवडायचे. सवयीनुसार त्या रात्री मी साधी खिचडी किंवा दही-भात ऑर्डर करायचो. सुरुवातीला तिला वाटले की माझे हे साधे जेवण म्हणजे बाहेर येण्याला माझा मूक विरोध आहे. मात्र, कालांतराने तिला समजले की ही सहजपणे माझी आवड आहे. तिने अशा जेवणाचे पैसे देण्यात कधीही खंत मानली नाही आणि मलाही कधी न्यूनगंड वाटला नाही. डेटिंगचा मूळ उद्देश हा आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीला हे जाणवून द्यावे की तुम्ही त्यांची ‘निवड’ केली आहे. तुम्ही त्यांच्या वेळेचा आणि उपस्थितीचा आदर करता. मग ते ‘सोल्जर पेमेंट’ असो किंवा पारंपरिक ट्रीट-त्यातून एकमेकांबद्दलची गुंतवणूक आणि आदर दिसला पाहिजे, तो वादाचा मुद्दा ठरू नये.
This post was originally published on this site.
हे पण वाचा-
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

