‘एक्सई’ची लागण झालेल्या रुग्णाचे काय झाले ? आदित्य ठाकरेंनी दिली माहिती

मुंबई : करोनाची तिसरी लाट ओसरण्याच्या मार्गावर असताना करोनाच्या उपप्रकाराचा संसर्ग झालेला रूग्ण मुंबईत आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने बुधवारी दिली होती. तसेच त्याच्यापासून फारसा धोका नसल्याचेही सांगितले होते. आता या रुग्णाबद्दल महत्त्वाची माहिती पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे दिली आहे.

ओमायक्रॉन हा करोनाचा उत्परिवर्तीत विषाणू आहे. करोनाच्या तिसऱ्या लाटेपासून ‘बी १’ आणि ‘बी २’ हे ओमायक्रॉनचे उपप्रकार देशात आढळत आहेत. या दोन्ही विषाणूंचे मिश्रण असलेल्या ‘एक्सई’ या विषाणूची बाधा मुंबईतील ५० वर्षीय आफ्रिकी महिलेला झाली होती.

एक्सई बाधित ही महिला आता पूर्णपणे बरी झाली आहे. तिच्या निकट संपर्कातील व्यक्तींच्या करोना चाचण्या केल्या असता त्यात एकही करोना बाधित आढळला नाही. या सर्वांचे नमुने आता पुनर्परीक्षणासाठी ‘जैववैद्यकीय जनुकशास्त्राच्या राष्ट्रीय संस्थे’कडे (नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ बायोमेडिकल जिनोमिक्स) पाठवण्यात आले असल्याची माहिती ठाकरे यांनी दिली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply