ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणण्याचे प्रयत्न? उदय सामंत स्पष्टच बोलले; म्हणाले, “ अंधेरी पोटनिवडणुकीत जो उमेदवार उभा असेल तो युतीचा असेल.”

शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र, ऋतुजा लटके यांना शिंदे गटात आणून उमेदवारी देण्यासंदर्भात शिंदे गटाचे प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले असताना मंत्री उदय सामंत यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

अंधेरी पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराबाबतचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. त्याबाबत मला काहीही माहिती नाही. मात्र, अंधेरी पोटनिवडणुकीत जो उमेदवार उभा असेल तो युतीचा असेल. आमचा बहुमताने निवडून येईल, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी सामनातील टीकेलाही प्रत्युत्तर दिले आहे. निदान आठ दिवसांनंतर तरी मुख्यमंत्री शिंदे मंत्रालायात येतात हे सामनाने मान्य केले आहे. त्यामुळे यावर जास्त काही बोलणार नाही, असा खोचक टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावला आहे. आजकाल सामना वाचताना तो ऐतिहासिक आणि पौराणिक कथा वाचल्यासारखा वाटतो, असेही ते म्हणाले.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply