उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा बाहेर काढणार; किरीट सोमय्यांचा इशारा

मुंबई: उद्या ठाकरे सरकारचा आणखीन एक घोटाळा बाहेर काढणार असा इशारा देत मी नाॅट रिचेबल का झालो होतो त्याचं उत्तर देणार असं भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या म्हणाले आहेत. आयएनएस विक्रांत घोटाळ्याप्रकरणी सोमय्या यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर ते काही दिवस अज्ञातवासात होते. आता कोर्टाने त्यांना दिलासा दिल्यानंतर ते पुन्हा समोर आले असून त्यांनी जोरदार कमबॅक केलं आहे.

सोमय्या म्हणाले की, एक डजन लोकांची प्राॅपर्टी अटॅच झालीये. अनिल देशमुख, श्रीधर पाटणकर, नवाब मलिकांसहीत त्यांची प्राॅपर्टी जप्त, संजय राऊत, यशवंत जाधव, अजित पवार, हसन मुश्रीफ, सदानंद कदम, अडसुळ आणि इतरांची संपत्ती अटॅच झालीये असं सोमय्या म्हणाले. तसेच नियमाप्रमाणे मी किंवा वकिल जाऊ शकतात, आम्ही कोर्टात सगळी माहिती देत आहोत, १९९७ - ९८ पासून विक्रांतची मोहीम सुरू झाली असं ते म्हणाले.

विक्रांतचा कार्यक्रम सिम्बॉलिक होता, विक्रांत वाचवण्यासाठी सेनेनं समर्थन दिलं होतं. १९९७ सालापासून सुरवात केलीये. संजय राऊतांनी ऊद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले असा आरोप त्यांनी केला. त्याचप्रमाणे रात्री १ वाजता माझ्यावर गुन्हा दाखल झाला, याला सेटींग म्हणतात असा टोला सोमय्यांनी लगावला आहे. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, ती कधीच वेगळी होणार नाही, केंद्रशासित होणार नाही असं म्हणत मुंबईचा आम्हाला अभिमान आहे असं सोमय्या म्हणाले. तसंच उद्या ऊद्धव ठाकरेंच्या कुटुंबियांचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार अशा इशारा त्यांनी दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply