इंदापूर :छत्रपतीने १२ लाख मेट्रीक टन उस गाळपाचा टप्पा केला पूर्ण; प्रशांत काटे

वालचंदनगर : भवानीनगर (ता.इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने चालू वर्षीच्या २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये १७८ दिवसामध्ये १२ लाख मेट्रीक टन उस गाळपाचा टप्पा पूर्ण केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी दिली.छत्रपती कारखान्याच्या २०२१-२२ च्या गळीत हंगामास २४ ऑक्टोबर २०२१ राेजी सुरवात झाली. कारखान्याच्या संचालक मंडळाने सुरवातीपासून १२ लाख मेट्रीक टन उस गाळपाचे उदिष्ठ ठेवले होते. १७८ दिवसामध्ये कारखान्याने उदिष्ठ पूर्ण केले. कारखान्याने आजपर्यंत १२ लाख १ हजार १७७ मेट्रीक टन उसाचे गाळप करुन १३ लाख १५ हजार ३०० क्विंटल साखरेची निर्मिती केली. यामध्ये ८ लाख २८ हजार ७७० मेट्रीक टन सभासदांचा उस गाळप केला असून ३ लाख ७२ हजार ४०७ मेट्रीक टन गेटकेनच्या उसाचे गाळप केले आहे. साखरेचा उसाचा उतारा ११.०७ टक्के मिळाला असून आत्तापर्यंत कारखान्याने सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ६ कोटी ११ लाख १ हजार ९०० युनिट विजेची निर्मिती केली असून यातील ३ कोटी ९७ लाख ७४ हजार युनिट महावितरणला निर्यात केली आहे. यासंदर्भात कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे यांनी सांगितले की,हंगामाच्या सुरवातीला संचालक मंडळाने १२ लाख मेट्रीक टन उस गाळपाचे उद्ष्ठि ठेवले होते. कारखान्याचे सभासद, परीसरातील शेतकरी, कारखान्याचे संचालक मंडळ, अधिकारी,कर्मचारी व उसतोडणी कामगार व वाहतुकदारांच्या सहकार्यामुळे उद्ष्ठि पूर्ण करण्यात संचालक मंडळाला यश आले आहे. छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रात सुमारे ३० हजार मेट्रीक टन उस शिल्लक असून येत्या काही दिवसामध्ये कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप पूर्ण करण्यात येणार असून सभासदांनी चिंता करु नये असे सांगितले.


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply