आवळ्याचा रस त्वचेला ठरतो फायदेशिर; जाणून घ्या भन्नाट फायदे

Amla Juice For Skin: आपण सर्व जण जाणतो की आवळ्याचा रस शरिरासाठी खुप फायदेशीर आहे. पण हे तुम्हाला माहितीये का आवळा तुमच्या त्वचेलाही हेल्दी ठेवतो. हा तुम्ही बरोबर ऐकले. आवळ्याचा रस सेवन केल्याने आपली त्वचा डाग विरहीत आणि ग्लोईंग बनते. आवळ्याचा उपयोग आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील केला जातो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह, कार्बोहायड्रेट, अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत. व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ए त्वचेसाठी खूप चांगले मानले जाते. रोज आवळा रस घेतल्यास आपण त्वचेला अनेक समस्यांपासून दूर ठेवू शकतो.

आवळ्यापासुन होणारे फायदे

1. त्वचेवरील डाग कमी करणे

रोज आवळा रस घेतल्याने त्वचेवरील डाग नाहीसे होतात. आवळ्यामध्ये एक असा एजंट असतो ज्यामुळे चेहर्‍यावरील डाग सहजपणे दूर होण्यास मदत होते.

2. त्वचेची जळजळ कमी करण्यासाठी

कधीकधी त्वचेमध्ये काही गोष्टी नसल्यामुळे जळजळ होण्याची समस्या उद्भवते. आवळा रस घेतल्यास त्वचेची सूज कमी होऊ शकते. कारण आवळ्यामध्ये एंटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे दाह कमी करण्यास मदत करू शकतात.

3. त्वचा मऊ करण्यासाठी

आवळा हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्रोत मानला जातो. व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असल्यामुळे त्वचेतील कोलेजेन पेशी वाढविण्यात मदत होते. ज्यामुळे त्वचा मऊ होऊ शकते.

4. त्वचेवरील सुरकुत्यापासून बचाव करण्यासाठी

जर त्वचेवर सुरकुत्या दिसू लागल्या तर त्वचेची चमक आणि सौंदर्य कमी होते. त्वचेवरील सुरकुत्या पासून बचाव करण्यासाठी तुम्ही आवळा रस घेऊ शकता. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आढळतो ज्यामुळे सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply