आमदार लक्ष्मण जगताप अनंतात विलीन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार

चिंचवड विधानसभेचे भाजपा आमदार लक्ष्मण पांडुरंग जगताप यांचं दुर्धर आजाराशी झुंज देत असताना निधन झालं आहे. ते ५९ वर्षांचे होते. नगरसेवक ते आमदार असा त्यांचा प्रवास असून लोकप्रिय आणि लढवय्ये नेते म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्यावर पिंपळे गुरव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. जिल्हाधिकारी राजेश देशमुख, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्यासह राजकीय व्यक्ती उपस्थित होते. 

तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार उमा खापरे, भाजपा नेत्या चित्रा वाघ, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, मंत्री तानाजी सामंत यांनी जगताप यांच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेतलं. हजारोंचा जनसमुदाय लक्ष्मण जगताप यांना निरोप देण्यासाठी अंत्यविधीच्या ठिकाणी जमा झाला होता.  

भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांची दुर्धर आजाराशी झुंज आज अपयशी ठरली. गेल्या तीन वर्षांपासून ते आजाराशी लढत होते. आज अखेर सकाळी पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी दोन च्या सुमारास लक्ष्मण जगताप यांचं पार्थिव पिंपळे गुरव येथील चंद्ररंग निवस्थानी आणण्यात आलं होतं. त्यांचं अंत्यदर्शन घेण्यासाठी हजारो नागरिकांची गर्दी निवासस्थानी झाली होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी जगतापांच्या पार्थिवाच अंत्यदर्शन घेतलं. समाजाची आणि पक्षाची न भरून निघणारी पोकळी पडल्याचे भावना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केली. 

लक्ष्मण जगताप यांनी आम्हाला चकवा दिला येरव्ही त्यांनी आजाराला चकवा दिला होता. मृत्यू ला ही त्यांनी हरवले होते. मात्र, अचानक त्यांनी प्रकृती खालावली. ते आज आपल्याला सोडून गेले. लोकसभा वगळता त्यांचा पराभव झाला नाही. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी हट्ट धरला आणि मुंबई ला रुग्णवाहिकेतून मतदानाचा हक्क बजावला. त्यांना ताप असताना त्यांनी मुंबई गाठली. निष्ठा म्हणजे काय हे त्यांनी दाखवून दिलं. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना गहिवरून आलं. बोलत असताना ते निशब्द झाले होते. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply