आमदार गणेश नाईकांच्या अडचणीत वाढ; इच्छेविरुद्ध ठेवले शारीरिक संबंध, गुन्हा दाखल

नवी मुंबई - भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण गणेश नाईक यांच्या विरोधात बेलापूर पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेला जिवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी तसेच इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याप्रकरणी पीडित महिलेने नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवरून नाईक यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

गणेश नाईक यांच्या बरोबर गेल्या 27 वर्ष लिव्ह इन मध्ये राहिल्याचा दावा देखील या महिलेने केला आहे. लिव्ह इन रिलेशनमधून या दोघांना15 वर्षाचा मुलगाही आहे. परंतु, या मुलाचा स्वीकार करण्यास गणेश नाईक यांनी नकार दिला आहे. आम्हाला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप देखील या महिलेने केला आहे.

पीडित महिला ही नेरुळ येथे राहत असून २७ वर्षांपासून महिलेची आणि गणेश नाईक यांचे संबंध आहेत. मार्च 2021 मध्ये सीबीडी येथील गणेश नाईक यांच्या कार्यालयात स्वत: कडील रिव्हॅालव्हर आपल्यावर रोखून ठार मारण्याची धमकी दिली होती, असा आरोप देखील या महिलेने केला आहे.

या घटनेनंतर पीडित महिलेने नेरूळ पोलीस ठाण्यात गणेश नाईक यांच्याविरोधात तक्रार दिली होती. परंतु, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नसल्यामुळे संबंधित महिलेने महाराष्ट्र महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यामुळे महिला आयोगाने या तक्रारीची गंभीर दखल घेत या प्रकरणी तात्काळ कारवाई करत अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानुसार बोलापूर पोलीस ठाण्यात गणेश नाईकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply