आंतरराष्ट्रीय योग दिवस २०२२: थकवा दूर करण्यासाठी ही योगासने करा

मुंबई : दिवसभर काम केल्यानंतर आपल्याला थकवा जाणवू लागतो. त्यामुळे सतत आपली चिडचिड होते. विश्रांती न मिळाल्याने आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. (International Yoga Day 2022)

योग केल्याने आपल्या शरीराला त्याचे अनेक फायदे होतात. शरीराला नव्याने ऊर्जा प्राप्त होते तसेच अनेक आजारांपासून दूरही राहता येते. ताण किंवा थकवा आल्यामुळे आपली डोकेदुखी वाढते व परिणामी आपल्याला औषधांचा वापर करावा लागतो. झोप पुर्ण न झाल्यामुळे आपल्याला चक्कर येऊ लागते किंवा डोळे सतत बंद होत राहतात. त्यामुळे कामात देखील आपले लक्ष लागत नाही. मानसिक व शारीरिक थकव्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवतात. यासाठी आपण औषधांचा वापर न करता त्यावर उपाय म्हणून आपण काही सोपी आसने आपण करु शकतो. ज्यामुळे आपल्या शरीरात ऊर्जेची पातळी वाढेल व थकवा कमी करण्यासही मदत होईल. (yoga benefits for health)

थकवा दूर करण्यासाठी ही योगासने करा-

१. आपण ध्यान करु शकतो ज्यामुळे आपल्याला वाटणारी नकारात्मक भावना दूर होईल. मन लावून ध्यान केल्याने मन: शांती मिळेल व थकवाही दूर होईल.

२. थकवा दूर करण्यासाठी अनुलोम विलोम प्राणायमाची आपण मदत घेऊ शकतो. आपली एक नाकपूडी बंद करून दुसऱ्या नाकपूडीतून श्वास घ्या असे दोन्ही नाकपूड्यातून केल्याने आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्राप्त होईल.

३. हस्त उत्तानासनात सरळ उभे राहून आपले हात डोक्यावरुन उचला. हात वर पसरवून किंचित मागे वाका. असे केल्याने आपल्या शरीराची हालचाल होईल व अंगदुखी कमी होईल.

४. कपालभाती प्राणायमात बसून सुरूवात करा. जोराने श्वास घेऊन तो सोडा ज्यामुळे आपली श्वास घेण्याची प्रक्रिया सुधारेल

५. पादहस्तासन करताना सरळ उभे राहून सुरुवात करा. गुडघ्यामध्ये वाकून आपले दोन्ही हाताने पायाला पकडा. असे केल्याने आपला मानसिक ताण कमी होण्यास मदत होईल.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply