अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून मातृत्व लादणाऱ्या नराधम वृद्धाला जन्मठेप

अकोला: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणाऱ्या एका वृद्धास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. धक्कादायक म्हणजे अल्पवयीन मुलीला लैंगिक अत्याचारामुळे पिडीता गर्भवती राहील होती.

मुलीच्या आई वडिलांनी दिलेल्या फिर्यादी नुसार दोघेही पती-पत्नी कामानिमित्त बाहेर जात असल्यामुळे 11 डिसेंबर 2016 रोजी त्यांची अल्पवयीन मुलगी दुपारी घरात एकटी होती. घराच्या बाजूला एका खोलीत भाडा भाड्याने राहणाऱ्या श्रीराम किसन बोंडे (66) रा. जोगळेकर प्लॉट, डाबकी रोड याने या मुलीला साबण आणण्याच्या हेतूने घरात बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

यानंतर सातत्याने या वृद्धाने मुलीचे लैंगिक शोषण केले. यातून मुलीला गर्भधारणा झाली. एक दिवस अचानक मुलीच्या पोटात दुखत असल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी तिला रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले.

पोलिसांनी तिची चौकशी केल्यानंतर तिने आरोपी श्रीराम बोंडे याने अत्याचार केल्याचे सांगितले. या प्रकरणात डाबकी रोड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.

अतिरिक्त सह जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांच्या न्यायालयात या प्रकरणात सुनावणी झाली. न्यायालयाने साक्ष व पुरावे ग्राह्य मानून आरोपी श्रीराम किसन बोंडे याला जन्मठेपे सह 50 हजार रुपये दंड, न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सहाय्यक सरकारी विधिज्ञ किरण खोत यांनी बाजू मांडली. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस कर्मचारी राजकुमार गणवीर एस आय प्रवीण पाटील यांनी काम पाहिले. या प्रकरणाचा तपास एपीआय संजय खंडारे यांनी केला.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply