अमेरिकेकडून ‘कापूस’कोंडी! बांगलादेशला फक्त ० टक्के, तर भारतावर १८ टक्केंचे आयत शुल्क

image

Impact of US Bangladesh textile agreement on Indian cotton farmers : अमेरिकेनं बांग्लादेशशी वस्त्रोद्योगासंदर्भात एक महत्त्वाचा करार केला. यामुळे भारतीय कापूस उत्पादक शेतकरी आणि कापड उद्योजक संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या करारानुसार, अमेरिकन कापसापासून बांग्लादेशात तयार होणाऱ्या कपड्यांवर अमेरिकेत शून्य टक्के कर आकारला जाणार आहे. तर भारताला १८ टक्के कर लागू केलाय.

बांगलादेशला अमेरिकन कापसापासून तयार केलेल्या कपड्यांवर शून्य टक्के आयात शुल्क लागू करण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. या निर्णयामुळे भारतातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बांगलादेश हा भारतीय कापसाचा प्रमुख ग्राहक आहे, मात्र आता तो अमेरिकन कापसाला प्राधान्य देण्याची भीती व्यक्त होत आहे. जर बांगलादेशाकडून भारतीय कापसाची मागणी घटली, तर देशांतर्गत बाजारपेठेत कापसाची आवक वाढून दर कोसळण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत बांग्लादेश भारतीय कापसाचा मोठा ग्राहक होता, मात्र या नव्या करारामुळे विदर्भ आणि महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस विक्रीत अडचणी येण्याची शक्यता आहे. स्थानिक बाजारात कापसाचे भाव पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारत सरकारला अमेरिकेवर दबाव टाकून भारतीय कापसासाठीही अशाच प्रकारची सवलत मिळवावी लागेल, अन्यथा शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण होऊ शकतो.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *