अमरावती : विद्युत अभियंतासमोरच गळफास घेण्याचा प्रयत्न; शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ठाकरे गटाचे आंदोलन

अमरावती : पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांना कृषीपंपाची बारा तास वीज देण्यात येत आहे. मात्र पश्चिम विदर्भाला यात वगळण्यात आले. शेतकऱ्यांच्‍या प्रश्‍नावर उद्धव ठाकरे गटाच्‍या शिवसेनेतर्फे वीज वितरण अभियंताच्या कक्षात आंदोलन केले. या आंदोलनात मुख्‍य अभियंत्‍याच्‍या कक्षातच पंख्‍याला दोरी बांधून एकाने आत्‍महत्‍येचा प्रयत्‍न केला. 

अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 40 कृषीपंपाच्या (डीपी) रोहित्र बंद आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच सिंचन करण्यासाठी मोठा त्रास होत आहे. शेतात सिंचन होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. यामुळे आज उद्धव ठाकरे गटाच्या ठाकरे गटातर्फे अमरावतीच्या मुख्य वीज वितरण अभियंताच्या कक्षात आंदोलन करण्यात आले. तर यावेळी राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या. यावेळी शिवसेना विभागीय संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.

युवासेना पदाधिकारी प्रकाश मारोटकर यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आक्रमक होत चक्क अभियंत्याच्या समोरच पंख्यावर दोर गळ्यात टाकून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अचानक आत्महत्येचा प्रयत्न प्रकाश मारोटकर यांनी केल्याने या ठिकाणी चांगलीच खळबळ उडाली होती. दरम्यान बंद असलेल्या सर्व डीपी तातडीने दुरुस्त करण्यात येईल; असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply