
पुणे : राज्य शासन समाजातील सर्व घटकांच्या सर्वागीण विकासासाठी बांधील आहे. त्यामुळेच राज्यात अपंगांसाठी नवीन स्वतंत्र विद्यापीठ सुरू करण्याचा शासनाचा विचार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
येथील बालेवाडी क्रीडा संकुलात अपंग मुला-मुलीच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचा पारितोषिक वितरण समारंभात पाटील बोलत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. पाटील म्हणाले, की शासनाने स्वतंत्र अपंग कल्याण विभागाची निर्मिती केली आहे. अपंगांसाठी स्वतंत्र विद्यापीठ सुरू करून त्यांचा सर्वागीण विकास करण्यात येईल. राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धातून अपंगही कुठे कमी नाहीत, असा संदेश समाजासमोर आला आहे. त्यामुळे अपंग मुलामुलींचे मनोबल वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अपंगांसाठीच्या राज्यस्तरीय स्पर्धामुळे अपंगांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्याबरोबरच नवीन अनुभूती त्यांना मिळाली आहे. ही अनुभूती त्यांच्या जीवनात कायम राहील. अशा स्पर्धातून खेळाडू तयार होऊन राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करतील. भविष्यात दिव्यांगांसाठी पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात येतील, असे पवार म्हणाले. या कार्यक्रमाला खासदार सुप्रिया सुळे, राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी मंत्री आमदार दत्तात्रय भरणे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अपंग विभागाचे आयुक्त ओमप्रकाश देशमुख आदी या वेळी उपस्थित होते.
नागपूर जिल्हा अव्वल
तीन दिवस झालेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत नागपूर जिल्ह्याने अव्वल स्थान पटकाविले. मूकबधिर, कर्णबधिर आणि बहुविकलांग या तीन प्रवर्गात विजेता संघ म्हणून नागपूर जिल्ह्याला तीन चषक प्रदान करण्यात आले. अंध प्रवर्गात अमरावती, अस्थिव्यंग प्रवर्गात उस्मानाबाद, मतिमंद प्रवर्गात मुंबई उपनगर जिल्ह्याने विजेतेपद मिळवले. अंध ,मूकबधिर, कर्णबधिर, अस्थिव्यंग या प्रवर्गात पुणे जिल्हा, बहुविकलांग प्रवर्गात लातूर जिल्हा उपविजेता ठरला.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रात दोन विधानसभा पोटनिवडणुकांचा बिगुल: बारामती आणि राहुरीत राजकीय हालचालींना वेग!
- उद्योगपती अनिल अंबानींच्या रिलायन्स पॉवरशी संबंधित कंपन्यांवर ईडीचा पहाटे मुंबईत १२ ठिकाणी छापा.
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- Pune Crime : वहिनीवर घरातच अत्याचार; 43 वर्षीय चुलत दिराला 10 वर्षांची सक्तमजुरी, बारामती न्यायालयाचा निकाल
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती


























Subscribe to my channel


