अक्कलकोटमधील ११ गावांचा कर्नाटकात सामील होण्याचा ठराव

अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यात २८ गावांमध्ये कर्नाटकात सामील होण्यासाठी काही मूठभर मंडळी जाणीवपूर्वक आंदोलनाचे नाटक करीत असल्यामुळे एकीकडे मराठी सीमा भागात तणाव वाढत आहे. तर दुसरीकडे अक्कलकोट तालुक्यातील ११ गावांनी स्थानिक विकासाच्या प्रश्नाचे निमित्त पुढे करीत कर्नाटकात सामील होण्याची मागणी केली आहे. या गावांनी मंजूर केलेल्या ठरावासह जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करण्यात आले आहे.

कलकर्जाळ, शेगाव, हिळ्ळी, कोर्सेगाव, कांदेवाडी खुर्द, आळगी, मंगरूळ, धारसंग, शावळ, देवीकवठे आदी गावांनी कर्नाटकात सामील होण्याची मागणी करणारे ठराव संमत करून जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केले आहे.

सीमा भागातील या गावांमध्ये स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांपासून पायाभूत विकास झाला नाही. रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण आदी सुविधांसाठी या गावांना उपेक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्राऐवजी कर्नाटक राज्यात सामील झाल्यास स्थानिक विकास होण्याचा विश्वास वाटतो, अशी भूमिका या गावांनी मांडली आहे. याबाबतचे निवेदन सादर करताना कन्नड वेदिके संघटनेचे जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन करपे, कन्नड साहित्य संस्कृती परिषदेचे समन्वयक सोमशेखर जमशेट्टी आदी उपस्थित होते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply