पोर्ट ब्लेअर : अंदमानात वाऱ्यांसह मुसळधार पावसाची शक्यता

पोर्ट ब्लेअर : आग्नेय बंगालचा उपसागर व लगतच्या अंदमान समुद्रालगतच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. (ता. २१) त्याची तीव्रता आणखी वाढून ‘असानी’ या चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून या वातावरणामुळे अंदमान आणि निकोबार बेटांवर जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे, बेटांवरील किनारी भागातील लोकांचे आज सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात येत आहे. अंदमान द्वीपसमूहाजवळच या वर्षातील पहिल्या चक्रीवादळाची निर्मिती होत आहे. प्रतिकूल हवामानामुळे बेटांदरम्यान होणारी जलवाहतूकही थांबविण्यात आली आहे. अंदमान आणि निकोबारची चेन्नई व विशाखापट्टणमशी होणारी जलवाहतूकही बंद करण्यात आली आहे. चक्रीवादळाचा धोका लक्षात घेऊन अंदमान व निकोबारमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे(एनडीआरएफ) १५० जवान तैनात करण्यात आले आहेत. बेटांवर सहा मदत छावण्याही सुरू केल्या आहेत. पोर्ट ब्लेअरसह उत्तर आणि मध्य अंदमान तसेच दक्षिण अंदमानात जिल्ह्यांत जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळत आहे. उत्तर आणि मध्य अंदमान जिल्ह्यातील नागरिकांना एनडीआरएफच्या जवानांकडून सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, शाळा आणि महाविद्यालयेही बंद करण्यात आली आहेत. आज चक्रीवादळात रूपांतर हे तीव्र कमी दाबाचे क्षेत्र रविवारी कार निकोबारच्या वायव्येला ११० किलोमीटरवर होते. (ता. २१) त्याची तीव्रता आणखी वाढून त्याचे ‘असानी’ या चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान खात्याने ट्विट करून दिली. मात्र, या चक्रीवादळाचा भारतीय किनारपट्टीला धोका नसून ते बांगलादेश-म्यानमार किनाऱ्याकडे सरकण्याचा अंदाज आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply