IPL 2022 : मुंबई इंडियन्स ‘प्ले ऑफ’ मध्ये जाणार नाही, टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूचा मोठा दावा

नवी दिल्ली, 25 मार्च: आयपीएल (IPL 2022) 26 मार्चपासून सुरू होत आहे. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी माजी सलामीवीर आणि समालोचक आकाश चोप्रा यांनी मुंबई इंडियन्सबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांची भविष्यवाणी ऐकून चोप्रा यांच्याविरोधात मुंबई इंडियन्सचे फॅन्स तीव्र नाराजी व्यक्त करतील अशी चर्चा सुरु झाली आहे.

आयपीएलच्या 15व्या हंगामाबाबत प्रचंड उत्सुकता आहे. कारणा मागील 2 वर्षात कोरोनामुळे आयपीएल प्रेक्षकांविना खेळवण्यात आली. त्यामुळे चाहते चातकासारखी वाट पाहत आहेत. प्रत्येकजण आपापल्या आवडत्या संघाचे समर्थन करत आहेत. अशातच आकाश चोप्रा यांनी त्याच्या युट्यूब चॅनेलवर आयपीएल संदर्भात भाष्य केले आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सबद्दल भविष्यवाणी करताना चाहत्यांचा रोष अंगावर ओढून घेतला आहे.

भारताचे दिग्गज समालोचक आणि क्रिकेट तज्ज्ञ आकाश चोप्रा यांनी यावेळी 5 वेळा चॅम्पियन असलेल्या मुंबई इंडियन्सबद्दल भाकीत वर्तवले आहे. ज्यामध्ये त्याने मुंबई इंडियन्सच्या या हंगामातील परिस्थितीपासून ते खेळाडूंच्या कामगिरीपर्यंत आपले अंदाज बांधले आहेत.

आकाश चोप्रा यांनी त्याच्या युट्यूब चॅनेलवर आयपीएल संदर्भात भाष्य केले आहे. यामध्ये मुंबई इंडियन्सबद्दल भविष्यवाणी करताना चाहत्यांचा रोष अंगावर ओढून घेतला आहे.

मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकणार नाही, असे आकाश चोप्रा यांनी मत व्यक्त केले आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे चाहते आकाश चोप्रा यांच्याविरोधाच सोशल मीडियावर नाराजी व्यक्त करती अशी चर्चा सुरु झाली आहे.

तसेच, सूर्यकुमार यादव मुंबईसाठी सर्वाधिक धावा करेल, असा पहिला अंदाज बांधत , जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट घेईल असे म्हटले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्सने आतापर्यंत पाच वेळा विजेतेपद पटकावले आहे. मुंबई इंडियन्सची गेल्या मोसमात निराशाजनक कामगिरी झाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ प्लेऑफमध्येही पोहोचू शकला नाही. यावेळी मेगा लिलावानंतर मुंबई इंडियन्सचा संघ बदलला आहे.

मात्र, मुंबई इंडियन्सकडे रोहित शर्मा, इशान किशन, सूर्यकुमार यादव, किरॉन पोलार्ड आणि जसप्रीत बुमराहसारखे स्टार खेळाडू आहेत. यंदाच्या आयपीएलच्या सीझनमध्ये सर्वांच्या नजरा चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सकडे लागल्या आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *