पुणे : SRH vs RR Live : संथ सुरुवातीनंतर बटलरची फटकेबाजी

पुणे: आयपीएल 2022 मधील पुण्यातला पहिलाच सामना हा सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होत आहे. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थान आणि सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघांचा हा यंदाच्या हंगामातील पहिलाच सामना असल्याने दोन्ही संघ हंगामाची विजयाने सुरुवात करण्यासाठी उत्सुक असणार आहेत.

आयपीएल 2022 च्या मेगा लिलावात हैदराबाद आणि राजस्थान संघात अनेक बदल झाले आहेत. त्यामुळे दोन्ही संघ नव्या खेळाडूंबरोबर कसे अॅडजेस्ट होतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. राजस्थानचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे. तर हैदराबादचे संघाचे नेतृत्व केन विलियमसन याच्याकडे आहे.

 


विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *