RRR चित्रपट पाहण्यासाठी 2 हजार रुपयांचे तिकिट

RRR Movie : टॉलीवूडचा प्रसिद्ध आरआरआर (RRR Movie) हा चित्रपट उद्या प्रदर्शित होणार आहे. एस एस राजामौली दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षक गेल्या (S S Rajamauli) तीन वर्षांपासून वाट पाहत आहेत. अखेर तो प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी तयार झाला आहे. दोन स्वातंत्र्यवीरांची गोष्ट सांगणारा आरआरआर हा (JR Ntr) उद्या जगभरात प्रदर्शित होणार आहे. पाच भाषांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचं गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु झालं (Ramcharan) आहे. सुरुवातीला बॉलीवूडचा भाईजान सलमान खाननं आरआरआरचं प्रमोशन केलं होतं. त्यानंतर आमीर खाननं देखील राजामौलींचा हा चित्रपट जरुर पाहावा असं आवाहन प्रेक्षकांना केलं आहे. थ्रीडी, २ डी, आयमॅक्स यासारख्या वेगवेगळ्या स्वरुपात हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

यंदाच्या वर्षीचा सर्वाधिक उत्सुकता असलेला आणि सर्वाधिक महागडा असा आरआरआर उद्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यासाठी प्रेक्षकांनी गेल्या दोन दिवसांपासून तिकिट बूक करण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी सर्वाधिक तिकिट 2 हजार 100 असल्याचे दिसून आले आहे. देशातील काही ठिकाणी या चित्रपटाचं तिकिट तब्बल दोन हजार रुपयांना विकलं गेल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. यावरुन आरआरआरची प्रेक्षकांना किती उत्सुकता आहे हे दिसून येते. राजामौली दिग्दर्शित या चित्रपटामध्ये रामचरण, ज्युनिअर एनटीआर, आलिया भट्ट, अजय देवगण यांच्या प्रमुख भूमिका आहेत. यापूर्वी आरआरआरच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्याला अल्पावधीतच कोट्यवधी नेटकऱ्यांनी कमेंटस दिल्या होत्या.

दिल्लीतील एका थिएटरमध्ये काही प्रेक्षकांना आरआरआरच्या पहिल्या शो चे तिकिट तब्बल दोन हजार रुपयांना विकत घ्यावे लागले आहे. काही ठिकाणी या शो चे तिकिट हाऊसफुल्ल झाले आहेत. तर काही सिनेमागृहांनी थिएटर हाऊसफुल्ल झाल्याचे बोर्डही लावले आहेत. मात्र काही सिनेमा समीक्षकांनी आरआरआरला काही संकंटांचा सामना करावा लागु शकेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. सध्या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द काश्मिर फाईल्सला जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. 15 कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटानं तब्बल 200 कोटी रुपये कमावले आहेत. त्यामुळे आरआरआरला देखील या चित्रपटाचा सामना करावा लागणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply