
Pimpri-Chinchwad : पिंपरी-चिंचवडमधून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पत्नी आणि मुलगी घर सोडून गेल्याच्या मानसिक तणावातून एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची घटना भोसरी परिसरात घडली आहे. केशरी प्रसाद शाहू असं या तरुणाचं नाव आहे. ही घटना काल दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. केशरी प्रसाद शाहू याने भोसरीतील भाजी मंडईच्या दुसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरून उडी घेत आपलं जीवन संपवलं.
'मला माझं आयुष्य जगायचं आहे'
आत्महत्येपूर्वी केशरी प्रसाद शाहू याने फेसबुक लाईव्ह करून आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला होता. या लाईव्हमध्ये तो रडत रडत 'मला माझ्या पत्नीला भेटायचं आहे, मला माझं आयुष्य जगायचं आहे', असं म्हणताना दिसतो. आत्महत्येपूर्वी केशरी प्रसाद शाहू याने तीन पानांची सुसाईड नोटही लिहिल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीतून त्याचं आपल्या मुलीवर असलेलं प्रचंड प्रेम स्पष्टपणे दिसून येतं. 'मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो, आय मिस यू दिव्यांशी', असा उल्लेख त्याने सुसाईड नोटमध्ये अनेकदा केला आहे.
|
|
सविस्तर माहिती अशी की, केशरी प्रसाद शाहू याची पत्नी गेल्या काही महिन्यांपासून त्याच्यासोबत राहत नव्हती. पत्नी मुलीसह घर सोडून गेल्यानंतर तो एकटाच राहत होता. या घटनेमुळे तो तीव्र मानसिक तणावात होता. काल दुपारी तो भोसरीतील भाजी मंडईच्या दुसऱ्या मजल्यावर गेला आणि पाण्याच्या टाकीवर चढला. त्याने मद्यपान केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुमारे एक मिनिट सहा सेकंदांचं फेसबुक लाईव्ह केलं होतं. या लाईव्हमध्ये 'मला जगायचं आहे, मला माझ्या पत्नीला भेटायचं आहे', असं तो वारंवार म्हणताना दिसतो.
पाण्याच्या टाकीवरुन उडी टाकली
दरम्यान, तो पाण्याच्या टाकीवरून उडी घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळताच भोसरी पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिकेला तात्काळ पाचारण करण्यात आलं. जवळपास अर्धा ते पाऊण तास पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो कोणाचंही ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. काही जणांनी त्याला वाचवण्यासाठी टाकीवर चढण्याचाही प्रयत्न केला, मात्र तो उडी घेईल या भीतीने कोणीही पुढे सरसावू शकलं नाही. अनेक नागरिकांनी हा प्रसंग मोबाईलमध्ये कैद केला. अखेर केशरी प्रसाद शाहू याने दुसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरून थेट उडी घेत आत्महत्या केली.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, आत्महत्येपूर्वी केलेला फेसबुक लाईव्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. केशरी प्रसाद शाहू याने आधीच आत्महत्येची तयारी केली होती. त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी आणि मुलीवरील प्रेमातूनच आपण हे टोकाचं पाऊल उचलत असल्याचं नमूद केलं आहे. पत्नी-मुलीचा विरह सहन न झाल्याने त्याने मृत्यूला कवटाळल्याचं स्पष्ट होत आहे. तसेच, मृत्यूनंतर आपल्या मुलीच्या हातून अग्नी द्यावा किंवा आपल्याला दफन करण्यात यावं, अशी इच्छाही त्याने सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली आहे.
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलं आहे?
सुसाईड नोटमध्ये केशरी प्रसाद शाहू याने काही गंभीर आरोप केले आहेत. 'मी पूर्ण शुद्धीत ही सुसाईड नोट लिहीत आहे. माझ्या पत्नीला पळवून लावण्यात काही जणांचा हात आहे. त्यांना माझी पत्नी कुठे आहे हे माहीत आहे. माझ्या मृत्यूला हेच जबाबदार आहेत. मला न्याय हवा आहे,' असं त्याने नमूद केलं आहे. तसेच, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले नसल्याचा आरोप करत, 'मला माझं आयुष्य पत्नी आणि मुलीसोबत जगायचं आहे. आता मला हे सहन होत नाही,' अशा शब्दांत त्याने आपली वेदना व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करत असून, सुसाईड नोट आणि फेसबुक लाईव्हच्या आधारे अधिक तपास सुरू आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले




























Subscribe to my channel


1 thought on “Pune Crime : ‘‘आय मिस यू दिव्यांशी…’,पत्नी-मुलीचा विरह असह्य; फेसबुक लाईव्ह करत तरुणानं उचललं टोकाचं पाऊल, पुण्यात खळबळ”