धायरी : नववीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका तीस वर्षीय विवाहित नराधमाकडून वारंवार लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना सिंहगड रस्ता परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे. रामेश्वर हंगरगे (वय 30, रा.नऱ्हे) असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पीडित मुलीकडे ऑनलाईन शिक्षणासाठी असलेल्या मोबाईलचा क्रमांक मिळवून रामेश्वर हंगरगे याने मागील सुमारे वर्षभरापूर्वी ओळख वाढवली. त्यानंतर वारंवार त्या पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याबाबत कोणाला काही सांगितले तर मुलीसह तिच्या आई-वडीलांना जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या मुलीने आपल्या वडिलांना याबाबत सांगितल्यानंतर त्यांनाही धक्का बसला. पीडित मुलीच्या वडिलांनी हा सर्व प्रकार ते ज्यांच्याकडे काम करतात त्यांना सांगितला. ते तात्काळ त्या पीडित मुलीला व तिच्या वडीलांना सिंहगड रोड पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नऱ्हे पोलीस चौकीत घेऊन गेले. तेथे पीडित मुलीच्या मुलीच्या फिर्यादीवरून दि. 20 मार्च 2022 रोजी रात्री उशिरा संबंधित नराधमावर गुन्हा दाखल करण्यात आला व त्यानंतर तातडीने कार्यवाही करत पोलीसांनी आरोपी रामेश्वर हंगरगे याला अटक केली. याबाबत पोलीस उपनिरीक्षक नितीन जाधव हे अधिक तपास करत आहेत.
या घटनेबाबत माहिती मिळताच मी तातडीने सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारवाईबाबत माहिती घेतली व संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलीसांनी आरोपीला अटक केली आहे," अशी माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.
"आरोपी हा पीडित मुलीच्या ओळखीतील आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर कोणताही विलंब न करता आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास करण्यात येत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत."
-युनुस शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती





















Subscribe to my channel

