पुणे :174 लाचखोर अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई नाही; शिक्षण, क्रीडा विभाग आघाडीवर…

पुणे : लाचखोर कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित असताना राज्यातील 174 लाचखोर अधिकाऱ्यांवर अद्याप कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे, विशेष म्हणजे लाच घेताना रंगेहाथ पकडले असताना तत्काळ निलंबन करावे असे शासनाचे आदेश असताना ही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे. लाचखोर कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले असतानाही अशा कर्मचाऱ्यांना निलंबित न करता केवळ लोकांशी संपर्क येणार आशा ठिकाणी बदली केल्याचे नगरविकास  विभागाच्या निदर्शनास आले, त्यामुळेच नगरविकास विभागाने 16 मार्च रोजी एक परिपत्रक काढलं आहे.

लाचेची मागणी सिद्ध करणारे पुरावे  निलंबनाची कारवाई आवश्यक असल्याचे म्हटले आहे, तशा सूचना नगरविकास विभागाने नगरपंचायती, नगर परिषदा, महापालिकांना दिल्या आहेत असे असतानाही वरीष्ठ अधिकारी लाचखोरांवर निलंबनाची कारवाई करताना दिसत नाही. राज्यातील 174 जणांवर सापळा रचून कारवाई झालेली असतानाही त्यांचे निलंबन झालेले नाही, त्यात सर्वाधिक शिक्षण, क्रीडा विभागातील कर्मचारी आहे.

कोणत्या खात्यातील किती अधिकारी

ग्रामविकास 32

शिक्षण आणि क्रीडा 45

महसूल, नोंदणी, भूमि अभिलेख,16

पोलीस, कारागृह, होमगार्ड- 14

नगरविकास-मनपा नगरपालिका- 22

उद्योग ,ऊर्जा, कामगार- 9

आरोग्य- 2

विधी आणि न्याय- 4

वन- 5

निलंबित न केलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यां क्षेत्रांवहाय संख्या मुंबई- 29 ठाणे- 20 पुणे- 12 नाशिक- 2 नागपूर- 56 अमरावती- 18 औरंगबाद- 8 नांदेड- 27


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply