शिवाजीराव भोसले बॅंक बुडव्या कर्जदारांच्या मालमत्ता लिलावात काढणार

पुणे - शिवाजीराव भोसले सहकारी बॅंकेच्या  थकबाकीदारांकडे सुमारे चारशे कोटींची थकबाकी असून, त्यांच्याकडून कर्ज वसूल करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या असून, थकीत रक्कम न भरल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात येणार आहेत. शिवाजीराव भोसले बॅंकेतील संचालकांच्या कथित गैरव्यवहारामुळे बॅंक अवसायनात आली होती. सध्या ठेव विमा महामंडळाच्या मदतीने पाच लाख रुपयांच्या आतील ठेवीदारांना ठेव रक्कम देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या पाच महिन्यांत ठेवीदारांना २६३ कोटींच्या ठेवी परत करण्यात आल्या आहेत. ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत देण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे बॅंकेचे कर्मचारी त्या कामात व्यस्त होते. त्यामुळे कर्ज वसुली मोहीम थांबली होती. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे आता कर्जबुडव्या थकबाकीदारांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. थकबाकीदारांना मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. कर्ज रक्कम न भरल्यास त्यांच्या मालमत्ता जप्त करून लिलाव करण्यात येणार आहेत, अशी माहिती बॅंकेचे अवसायक डॉ. आर. एस. धोंडकर यांनी दिली. ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याच्या प्रक्रियेत कर्मचारी व्यस्त असल्यामुळे कर्ज वसुलीकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु कर्ज वसुली मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. कर्ज वसुलीसाठी थकबाकीदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. वसुली दाखले नसलेल्या थकबाकीदारांच्याही मालमत्ता जप्त करण्याचे अधिकार अवसायकांना आहेत. - डॉ. आर. एस. धोंडकर, अवसायक, शिवाजीराव भोसले सहकारी बॅंक


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply