पुण्यात अवकाळी पावसाच्या सरी; काही भागात ढगांचा गडगडाट

राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. यामध्ये नागपूर, नाशिकमध्ये सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गारांसह पाऊस पडला. याशिवाय राज्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडेल असं हवामान विभागाने म्हटलं होतं. पुण्यात बाणेर, बालेवाडी, विश्रांतवाडीमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर वादळी वाऱ्यासह ढगांचा गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. पिंपरी चिंचवडमध्येही काही काळ पावसाने झोडपले. नाशिक, पुणे आणि साताऱ्यातील काही भागात पुढच्या दोन-तीन तासात पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. नाशिक, सातारा, पुणे, सोलापूर, सांगली, बीड, अहमदनगर, औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, अमरावती आणि आजूबाजूच्या काही भागात सांयकाळी चारच्या सुमारास ढगाळ वातावरण होते. पुणे, नाशिकसह साताऱ्यात घाट माथ्यावर ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच सकाळपासून ढगाळ वातावरण असलेल्या जिल्ह्यात देखील पावासाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोराचे वारे वाहत आहेत. परिणामी, गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोकण, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागांत तुरळक पाऊस पडला आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply