पुणे : जिच्यावर जिवापाड प्रेम केलं तिचाच घोटला गळा …

पुणे ०८ मार्च -पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी  परिसरात ए क धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका तरुणानं आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली आहे. आरोपी तरुण मागील काही महिन्यांपासून मृत तरुणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये  राहत होता. दरम्यान दोघांत खटके उडाल्यानंतर आरोपीनं तिचा गळा आवळून हत्या केली आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली आहे. हत्येची घटना उघडकीस येताच पोलिसांनी अवध्या काही तासात संशियत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

रितू भालेराव असं हत्या झालेल्या 20 वर्षीय तरुणीचं नाव आहे. मृत रितू ही मूळची औरंगाबाद जिल्ह्यातील रहिवासी असून ती काही दिवसांपूर्वी पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आली होती. तर श्याम ढेरे असं आरोपीचं नाव असून तोही पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होता. संबंधित दोघं मागील पाच ते सहा महिन्यांपासून पिंपरी चिंचवडमधील निगडी परिसरात 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहत होते. याठिकाणी दोघंही नवरा बायकोसारखं राहायचे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *