स्थिर इंधन दरामुळे वाहनचालकांना दिलासा

पुणे - अनलॉक (Unlock) सुरू झाल्यानंतर सततच्या दरवाढीला (Rate Increase) वैतागलेल्या वाहनचालकांना (Vehicle Driver) मागील चार महिन्यांपासून मोठा दिलासा (Comfort) मिळाला आहे. गेल्या ४ नोव्हेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Rate) एकदाही वाढलेल्या नाहीत. देशात कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढे दिवस पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर आहेत. शहरात मार्च २०२० मध्ये पेट्रोलचे दर ७७.१५, तर डिझेल ६४ रुपये प्रति लिटर होते. तसेच सीएनजी गॅस ५५ रुपये प्रतिकिलो होता. त्यानंतर अनलॉक सुरू होण्यापर्यंत इंधनाच्या दरात मोठे बदल झाले. मात्र, अनलॉकनंतर सातत्याने इंधनांच्या किमती वाढत जाऊन सध्या शहरात पेट्रोल १०९.५०, तर डिझेल ९२.५० रुपये प्रतिलिटर झाले आहे. तर सीएनजीचा दर ६६ रुपये प्रतिकिलो आहे. पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल दहा रुपयांनी स्वस्त झाल्यानंतर वाहनचालकांना दिवाळी गिफ्ट मिळाले होते. त्यानंतर दरवाढीचा दिलासा अद्याप कायम आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply