Pune News : चालकाला फिट आली अन्..., पुणे-सोलापूर महामार्गावर स्कूल बसला भीषण अपघात

Pune - सोलापूर महामार्गावर स्कूल बसला अपघात झाला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना ही घटना घडली. थेऊर फाटा येथे हा अपघात झाला. या बसमध्ये ४० विद्यार्थी होते. चालकाला फिट आल्यामुळे ही घटना घडली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणताही विद्यार्थी जखमी झाला नाही. या अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर ट्राफिक जाम झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, कुंजीरवाडी येथून विद्यार्थ्यांना घेऊन स्कूल बस लोणी काळभोर येथील एंजल हायस्कूलच्या दिशेने निघाली होती. यावेळी थेऊर फाट्याच्या चौकात रस्ता क्रॉस करताना ड्रायव्हरला अचानक फिट आली. भरधाव वेगान असलेल्या या बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या डाव्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यांमध्ये पडली आणि अपघात झाला.

Uddhav Thackeray On Amit Shah : अमित शहांच्या 'त्या' वक्तव्यावर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, थेट पीएम मोदींना केला सवाल

या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र अपघात झाल्यामुळे मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. स्थानिक नागिराकांनी घटनास्थळी धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढले. बसमधील ४० विद्यार्थ्यांना पर्यायी वाहनाने स्कूलमध्ये पाठवण्यात आले आहे. तसेच काही मुलांना त्यांचे पालक घरी घेऊन गेले आहेत.

तर बस चालकाला कुंजीरवाडी येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, यावेळी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सदर बस ट्रॅक्टरच्या सहाय्याने खड्ड्यातून बाहेर काढण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply