नाशिक : लाल कांदा संपण्याच्या टप्प्यात असताना उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाल्याने स्थानिक बाजारपेठेत भाव घसरणीला लागले आहेत. सोमवारी (ता. २८) दिवसभरात सरासरी ७१० रुपये क्विंटल भावाने कांद्याची विक्री झाली. तसेच पाकिस्तानचा कांदा उपलब्ध नसल्याने आखाती देशांसह श्रीलंका, सिंगापूर, मलेशियामधून कांद्याची मागणी वाढली असली, तरीही कांद्याच्या निर्यातीसाठी कंटेनरची चणचण भासत आहे.
आर्थिक वर्षाखेरीमुळे निर्यातीला वेग आला असल्याने कांद्यासाठी कंटेनर मिळणे मुश्कील झाले आहे. श्रीलंका, सिंगापूर, मलेशियासाठी ३० टनाच्या कंटेनरला एक हजार ९०० च्या जागी अडीच हजार डॉलर भाडे देऊनही कंटेनर मिळत नसल्याची निर्यातदारांची व्यथा आहे. दुबईसाठी कंटेनरचे भाडे दोन हजार डॉलरवरून तीन हजार डॉलरपर्यंत पोचले आहे. मार्चएंडला बंदरात ट्रॅफिक जामच्या समस्येला निर्यातदारांना गेल्या वर्षीपर्यंत सामोरे जावे लागत होते. पण, यंदा ही स्थिती अद्याप उद्भवली नसल्याचे निर्यातदारांनी सांगितले. सद्यःस्थितीत कंटेनरचे भाडे वाढल्याने एका कंटेनरभर कांद्याच्या भावात ५० ते ७० हजार रुपयांची वाढ होत असली, तरीही आखाती देशातून भारतीय कांद्याला चांगली मागणी आहे. पाकिस्तानचा नवीन कांदा बाजारात येण्यासाठी आणखी दीड महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे सिंगापूर, मलेशिया, श्रीलंका, दुबईसह आखाती देशांना भारतीय कांद्याशिवाय पर्याय नसेल. अशातच, पाकिस्तानमधील राजकीय अस्थिरतेचे ढग कायम राहिल्यास कांद्याच्या उपलब्धतेचे प्रश्न तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पंधरा दिवस लाल कांदा विक्रीस येईल
लाल कांदा आणखी पंधरा दिवस विक्रीसाठी येऊ शकेल, अशी स्थिती आहे. त्यातच, लाल कांद्याच्या गुणवत्तेचा प्रश्न तयार झाला असल्याने भाव कमी मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. उन्हाळ कांद्याची साठवणूक अधिक काळ होत असल्याने बहुतांश शेतकरी सध्याच्या कोसळलेल्या भावात कांद्याची विक्री कितपत करतील? हा प्रश्न कायम आहे. तसे घडल्यास लाल कांदा संपल्यावर भाव स्थिरावण्यास हातभार लागणार आहे. पण तरीही केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीकडे लक्ष दिल्यास शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकेल, असे मानले जात आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Health - साधी डाळ बनवा चविष्ट: ५ झणझणीत तडके देण्याची सोपी कृती जाणून घ्या
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती



























Subscribe to my channel


