रायगड : मतदान ओळखपत्र आणखी सुरक्षीत होणार; बोगस मतदार संख्या शून्यावर येणार

मतदान ओळखपत्र (Voting Identity card) अधिक सुरक्षित करण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार आधार कार्डच्या (Aadhar card) धर्तीवर या ओळखपत्राची सुरक्षा मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहेत. दुबार मतदारांची नोंदणीवरही निर्बंध आणून दोन वर्षांत बोगस मतदार (Fake voters) संख्या शून्यावर येणार आहे, असा दावा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे (Shrikant deshpande) यांनी सोमवारी (ता.७) केला. अलिबाग येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे आदी उपस्थित होते. सुरुवातीच्या कालावधीत मतदान ओळखपत्र साध्या पद्धतीचे होते. त्यामुळे ते हाताळताना मतदारांना अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने ओळखपत्र सहजरित्या हाताळता यावे यासाठी स्मार्ट कार्डची सुविधा सुरू केली. मतदारांना रंगीत छायाचित्रासह स्मार्ट कार्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली. परंतु मतदान ओळखपत्र आणखी सुरक्षित करण्यासाठी निवडणूक विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply