मुंबई : “हिंदुंच्या सणाला परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का?”- आशिष शेलार सरकारवर बरसले

मुंबई: "हिंदुंच्या सणाला परवानगी देताना यांच्या हाताला लकवा मारतो का? असा संतप्त सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारत सरकारवर टीका केली आहे. राम भक्तांवर ठाकरे सरकारचाकाय राग आहे कळत नाही असं म्हणत जेव्हा-जेव्हा हिंदू सण येतात तेव्हा परवानगी देताना यांच्या (मविआ सरकारच्या) हाताला लकवा मारतो का? असा टोला त्यांनी ठाकरे सरकारल लगावला आहे. मुंबईतील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शेलार म्हणाले की, गुढीपाडवा नववर्षाच्या शोभा यात्रा निघतात, तसेच राम जन्माला देखील मिरवणूका निघतात पण याच्या परवानगीची स्पष्टता नाही. मुंबई पोलिसांनी 10 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत जमावबंदीचे आदेश दिले आहेत, त्याला कारण दिले आहे की आतंकवादी ड्रोन किंवा इतर माध्यमांचा वापर करून हल्ला करणार आहे असे म्हटले आहे. 10 मार्च ते 8 एप्रिल पर्यंत 144 कलम लावले आहे याला आक्षेप घेत शेलार यांनी हिंदू सण म्हटले की हाताला लकवा मारतो आणि शिवसेनेची भूमिका काय आहे हे स्पष्ट करावे असं आवाहन शिवसेनेला केलं आहे.

पुढे आशिष शेलार म्हणाले की, 6 एप्रिलला भाजपचा वर्धापन दिवस असतो. वर्धापन दिनानिमित्त एक व्यापक कार्यक्रम ठरवला आहे. भाजप हा जमिनीवर काम करणारा पक्ष आहे. देशात सर्वात जास्त सेवा करणारा पक्ष आहे. मुंबईत 6 एप्रिलला मुंबईतील शक्ती केंद्रात आम्ही सार्वजनिक कार्यक्रम करणार आहोत असं म्हणत यावेळी सकाळी पावणे दहा वाजता मोदीही बोलणार आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे.

मुंबईत दीड हजार ठिकाणी कार्यक्रम करणार असून सेवा सप्ताह असा कार्यक्रम असल्याचही ते म्हणाले. तसेच मुंबईत आम्ही ताकदीने सेवा करायचे ठरवले आहे. मुंबईतील सर्व नाल्यावर भाजप नालेसफाईची पाहणी आणि सुरुवात करणार आहे अशी माहिती देत सत्ताधारी शिवसेनेनं हात झटकून दिले आहेत आणि प्रशासन हातावर हात धरून बसले आहेत आणि आम्ही दोघांनाही पळ काढू देणार नाही असंही आशिष शेलार म्हणाले. 6 ते 14 एप्रिल हा सप्ताह आहे, 14 एप्रिलला बाबासाहेब आंबेडकर जन्मदिवस आम्ही करणार आहोत अशीही माहिती त्यांनी दिली. आशिष शेलार पुढे म्हणाले की, शिवसेना कार्यक्रम करतात तेव्हा ही कारणे येत नाही. हॅप्पी स्ट्रीट आणि वांद्रे वंडर लँड चालणार पण गुढीपाडवा नाही हे आम्ही चालू देणार नाही. भ्रष्टाचाराबाबत शेलार म्हणाले की, आम्ही कोर्टात गेलेलो आहोत. नालेसफाईच्या मुद्द्यावरही शेलार म्हणाले कि, मुंबईकरांचा जीव येणाऱ्या पावसात असुरक्षित आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply