रायगड: खनलोशी मध्ये नवे औद्योगिक क्षेत्र ? कामांसाठी निविदा केली प्रसिद्ध

श्रीवर्धन : म्हसळा तालुक्यातील खनलोशी येथे नवे औद्योगिक क्षेत्र उभारण्यात येणार आहे. दिघी पोर्टजवळ हे नवे औद्योगिक शहर विकसित करण्यासाठी औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिपच्या  प्रशासनाने औद्योगिक प्रकल्प व्यवस्थापन कामांसाठी विनंती प्रस्ताव निविदा प्रसिद्ध केली आहे. दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र हे दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरअखेरचा टप्पा आहे. स्मार्ट औद्योगिक व निवासी सुविधा विकसित करण्यासाठी डीएमआयसीने गेल्या काही वर्षांपूर्वी तळा तालुक्यात भूसंपादन प्रक्रिया सुरू केली होती; परंतु शेतकरी भूमिहीन होतील या कारणास्तव त्याला विरोध झाला होता. या विरोधामुळे तळा तालुक्यातील भूसंपादन रद्द करण्यात आले होते. रोहा आणि माणगाव तालुक्यातील भुवन, दुरटोली, विघवली ते निजामपूरदरम्यान दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉरने पूर्वीच संपादित केलेल्या जमिनीवर स्मार्ट सिटी उभारण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. प्रक्रिया, औषधनिर्माण, अभियांत्रिकी क्षेत्रातील उद्योगासाठी हे शहर उभारण्याचे नियोजन बाबत आणि प्रत्यक्ष दिघी पोर्टजवळील खानलोशी गावातदेखील ९४ हेक्टर जमिनीवर बंदरावर आधारित औद्योगिक आस्थापनांकडून औरंगाबाद इंडस्ट्रिअल टाऊनशिपच्या प्रशासनाने स्वारस्य निविदा एकाच दिवशी प्रसिद्ध केल्या आहेत. नवीन खानलोशी एमआयडीसीमध्ये वेअरहाऊसिंग, कोल्ड स्टोरेजेस, प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. खनलोशीपासून दिघी बंदर हे १३ किलोमीटर; तर जेएनपीटी बंदरापासून १३० किलोमीटरवर आहे.  


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply