किरीट सोमय्या : यशवंत जाधव यांच्यावर कारवाईची मागणी

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांनी २४ महिन्यांत ३६ मालमत्ता विकत घेतल्या असल्याचा आरोप आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. जाधव यांची एवढी मालमत्ता असेल तर त्यांच्या नेत्यांकडे किती असेल, असा प्रश्‍नही सोमय्या यांनी केला. त्यानंतर आता यशवंत जाधव यांच्यावरील कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी सोमय्यांनी दिल्ली गाठली आहे. किरीट सोमय्या यांनी स्वत: ही माहिती दिली असून, काही वृत्तपत्रांची कात्रणं देखील त्यांनी यावेळी शेअर केली आहे. यशवंत जाधव यांच्या १००० कोटींच्या संपत्तीच्या कारवाईचा पाठपुरावा करण्यासाठी दिल्लीत आपण काही लोकांच्या भेटीगाठी देखील घेणार असल्याचं सोमय्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शिवसेनेची चिंता वाढल्याचं बोललं जातंय. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी काल महाविकास आघाडी सरकारच्या १२ नेत्यांची यादी जाहीर केली होती. डर्टी डझन्स असं त्यांनी संबोधलं होतं. आणि या नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचं सांगितलं. यामध्ये जाधव यांचं नाव नव्हतं. आता स्थायी समितीच्या अध्यक्षावरच आयकर विभागाचा छापा पडल्यानंतर सोमय्यांनी नवी यादी जाहीर केली. यामध्ये यशवंत जाधव, मुंबईच्या महपौर किशोरी पेडणेकर आणि यामिनी जाधवांच्या नावांचा समावेश आहे. याआधी सोमय्यांनी बारा नेत्यांची यादी जाहीर केली होती. त्यामध्ये अनिल परब,संजय राऊत, सुजीत पाटेकर, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, हसन मुश्रीफ, प्रताप सरनाईक, रविंद्र वायकर, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख आणि नवाब मलिकांच्या नावांचा समावेश आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply