Mumbai News : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूरकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, नवीन एक्सप्रेस वे तयार होतोय, MMRDA चा निर्णय

Badlapur Ambernath Ulhasnagar Kalyan Expressway : उपनगरातून मुंबईत दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. MMRDA मुंबई आणि उपनगाराला जोडणारा नवा एक्सप्रेस वे तयार करणार आहे, त्यामुळे अनेकांचा प्रवास सुकर आणि जलद होणार आहे. हा एक्सप्रेस वे मुंबई, नवी मुंबई, नवी मुंबई विमानतळ हायवेला कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरशी जोडला जाईल. या एक्सप्रेस वेवर ३ बोगदे असतील, तसेच पाच भुयारी मार्ग (अंडरपास) असतील. २० किमी लांब असणाऱ्या महामार्गावर चार इंजरचेंज असतील. या एक्सप्रेस वे च्या निर्मितीसाठी २०० हेक्टेअर जमीन अधीगृहण करावी लागणार आहे. त्यासाठी 10,833 कोटींचा खर्च लागेल, असा अंदाज आहे.

एक्सप्रेस वे साठी टेंडर निघाले?

डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ आणि उल्हासनगर या शहरातील लोकसंख्या वेगानं वाढतेय. त्यामुळे अनेकदा वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. नवीन होणारा एक्सप्रेस वेमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणने (एमएमआरडीए) नुकतेच नव्या एक्सप्रेस वेच्या निर्मितीसाठी टेंटर काढले आहे. बोगद्यासाठी सविस्तर अहवाल तयार करण्यासाठी टेंडर काढण्यात आलेय.

एक्सप्रेस वेवर इंटरचेंज असतील -

रिपोर्ट्सनुसार, हा हायवे बदलापूरमधून सुरू होणार.. मुंबई-दिल्ली, मुंबई-बडोदा, कटाई-बदलापूर आणि कल्याण रिंग रोड ला जोडला जाणार आहे. या एक्सप्रेस वेमधील पहिलं इंटरचेंज अंबरनाथमधील पालेगांवमध्ये असेल. दूसरे इंटरचेंज कल्याण पूर्वमधील हेदुत्ने येथे असेल. हा एक्सप्रेस वे कल्याण रिंग रोड आणि कल्याण शिळफाटा रोडला जोडला जाणार आहे.

Pune Ring Road : पुण्याची वाहतूक कोंडी फुटणार! रिंगरोड प्रकल्पाला गती, फेब्रुवारीमध्ये कामाला सुरुवात

वेळ, अंतर वाचणार -

नव्या एक्सप्रेस वे मुळे वेळ आणि अंतर दोन्ही वाचणार आहे. नवी मुंबई आणि कल्याण, ठाणे, बदलापूर आणखी जवळ येणार आहे. हा मार्ग नवी मुंबई आणि मुंबई उपनगरामधील अंतर कमी करण्यास मदत करेल. यामुळे ठाणे आणि आसपासच्या भागात वाहतूककोंडीची समस्या देखील कमी होईल.

8 लेनचा एक्सप्रेस वे

नवा एक्सप्रेस वे आठ लेनचा असेल असे सांगण्यात येतेय. ८० किमी प्रति तास वेगाने वाहन चालवले जाऊ शकते. या एक्सप्रेस वेसाठी १७ फेब्रुवारीपर्यंट टेंडर भरता येईल. त्यानंतर कामाला सुरूवात होणार आहे.

एक्सप्रेस वे वर ३ बोगदे -

नवी मुंबई आणि बदलापूरला जोडणाऱ्या या एक्सप्रेसवर तीन बोगदे आणि पाच अंडरपास असतील. याची लांबी २० किमी असेल. यामध्ये चार इंटरचेंजही असतील. एक्सप्रेस वेसाठी 200 हेक्टर जमीन द्यावी लागेल. त्यासाठी अंदाजे 10,833 कोटी रुपये खर्च होऊ शकतो.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply