Mumbai Air Pollution : मुंबईकरांचा श्वास कोंडला, हवेचा स्तर खालावला, पाहा किती आहे AQI?

Mumbai : हिवाळा सुरु होताच हवेची गुणवत्ता खराब झाल्याचं पाहायला मिळतंय. दिवाळीपूर्वीच दिल्लीतील वायू प्रदूषणावर चिंता व्यक्त केली जात होती. यातच मुंबईमध्ये देखील हीच स्थिती दिसून येतेय. मुंबईतील काही भागात हवेचा स्तर खराब झाल्याचं समोर आलंय. मुंबईतील काही भागाच्या हवेतील गुणवत्तेने २०० (AQI) एअर क्वालिटी इंडेक्स ओलांडली.

सध्याच्या घडीला असलेलं वाढतं प्रदूषण हे आरोग्याच्या दृष्टीनं चिंतेचा विषय आहे. सततची बांधकामं, वाहनांमधून निघणारा धूर, यासह इतर प्रदूषणाच्या घटकांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. याला कारणीभूत कंपन्याच असल्याचं, तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाचे एफ समीर म्हणतात, 'सोमवारी मुंबईच्या हवेची गुणवत्ता १९० AQI ने नोंदवली गेली. याचं प्रमाण वाढत गेलं, तर आरोग्यासाठी धोका निर्माण होईल, अशी देखील भीती त्यांनी व्यक्त केली.

Supreme Court : मतदान केंद्रावर मतदारांची संख्या 1200 वरून 1500 का केली? निवडणूक आयोगला कोर्टाचा सवाल

३ आठवड्यांपर्यंत सुधारणा नाहीच

यासंदर्भात हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी संस्था, SAFAR चे संचालक गुफरान बेग यांनी माहिती दिली की, 'मुंबईच्या AQI मध्ये पुढील २ आठवडे तरी हवेच्या गुणवत्तेत फार कमी सुधारणा होण्याची शक्यता आहे. कारण वाहनातून निघणारा धूर, गगनचुंबी इमारती आणि बांधकामांमुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. ज्यामुळे नागरिकांच्या फुफ्फुसांवर धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

मुळात समुद्रातून येणारे वारे प्रदूषणाचे कण घेऊन जातात. पण तापमानात घट झाल्यामुळे प्रदूषणाचे कण हवेतच राहतील. अशा वातावरणातील प्रदूषणापासून दिलासा मिळणं अशक्य आहे.

मागील वर्षी, हवेच्या गुणवत्तेवर सुधारणा करण्यासाठी काही उपाययोजना आखल्या गेल्या. ज्यात, लॉन्ड्री अँड फॉन्ड्री, रेडी मिक्स काँक्रट प्लाँट्स, डाँइग इन्सटॉलेशन्स, तसंच झवेरी बाजारातील सोन्या चांदीचे समेल्टिंग युनिट्सवर बंदी घालण्यात आली. ज्यामुळे बऱ्याच अंशी खराब हवेच्या गुणवत्तेवर नियंत्रण मिळवता आलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply