औरंगाबाद : ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरू ठेवणार – जयप्रकाश दांडेगावकर

अंकुशनगर : औरंगाबाद व नांदेड विभागातील अतिरिक्त ऊस गाळप होईपर्यंत कारखाने बंद केले जाणार नाहीत, असे राज्य सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी स्पष्ट केले. अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना येथे सोमवारी (ता.२८) दोन्ही विभागातील ऊस गाळप आढावा व अतिरिक्त ऊस गाळपाबाबत राज्यस्तरीय बैठक घेण्यात आली. बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, आमदार बाबाजानी दुर्राणी, साखर आयुक्तालयाचे सहसंचालक पांडुरंग शेळके, महासंघाचे कार्यकारी संचालक संजय खताळ, अजित चौगुले, शरद जरे, एस.बी.रावळ आदींची उपस्थिती होती.

श्री.दांडेगांवकर म्हणाले, की सध्या उन्हाळ्यामुळे ऊसतोड कामगार टिकवणे हे कारखान्यासाठी आव्हान आहे. कारखान्यांनी ऊसतोड कामगारांना १०० रुपये प्रति टन जास्तीचा भाव दिल्यास कामगार टिकून राहतील. ही रक्कम थेट कामगारांना देण्याबाबतही नियोजन करावे. कारखान्याच्या एका संचालकाने १५ गावात कर्मचारी सोबत घेऊन ऊस गाळपाचे नियोजन करून अतिरिक्त उसाचा प्रश्न मार्गी लावावा. औरंगाबाद व नांदेड विभागात पुढील हंगामात या पेक्षा जास्त ऊस लागवड क्षेत्र असल्यामुळे कारखान्यांनी नियोजन करणे गरजेचे आहे, असे नमूद केले.

यावेळी समर्थ कारखान्याचे उत्तमराव पवार उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनोज मरकड, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बी.टी.पावसे, कार्यकारी संचालक डी.एस.पाटील आदी उपस्थित होते.

अकरा लाख टन ऊस शिल्लक कार्यक्षेत्रात अंदाजे १० लाख ९७ हजार टन ऊस शिल्लक आहे. यापुढे हंगाम अखेर दोन्ही विभागाकडे एकूण पाच ते साडेपाच लाख टन उसाचे गाळप होईल असा अंदाज आहे. या व्यतिरिक्त कारखाना कार्यक्षेत्रात अंदाजे ५ लाख ४० हजार टन ऊस अतिरिक्त आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply