पुणे : मगरपट्टा परिसरात कार, रिक्षावर झाड कोसळले; सुदैवाने जीवीतहानी टळली

मगरपट्टा परिसरात एका सोसायटीच्या परिसरात मोटार तसेच शेजारी लावलेल्या रिक्षावर झाड कोसळण्याची घटना सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटार तसेच रिक्षाची पाहणी जवानांकडून करण्यात आली. मोटार आणि रिक्षात कोणी अडकले नसल्याची खात्री पटल्यानंतर जवानांनी कटरच्या सहाय्याने मोटार आणि रिक्षावर पडलेल्या झाडांच्या फांद्या कापल्या. त्यानंतर क्रेनच्या मोटार आणि रिक्षा तेथून हलविण्यात आली. या घटनेत मोटार आणि रिक्षाचे नुकसान झाले.

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *