पुणे : सध्या राज्यात मशिदीवरील भोंग्यावरून राजकारण सुरू आहे. त्यामुळे मशीद आणि मंदिरात पोलिसांना बैठका घेऊन भोंग्यांविषयी जनजागृती करण्याची वेळ आलीय. पिंपरी-चिंचवडमध्ये हिंदू आणि मुस्लीम बांधवांना एकत्र बोलावून बैठका घेण्यात येत आहेत. शहरातील नेहरू नगर भागात मशीद, हनुमान मंदिर, साई मंदिर आणि महादेव मंदिर शेजारी- शेजारी आहेत. मात्र आम्हाला एकमेकांच्या भोंग्यांचा कधीच त्रास झाला नाही, अशी प्रतिक्रिया जामा मशीदीचे अध्यक्ष नजीर भाई आणि हनुमान मंदिराचे ट्रस्टी हृषीकेश भोसले यांनी दिली आहे. गेल्या ४० वर्षांपासून येथे हिंदू मुस्लीम ऐक्याची परंपरा सुरू आहे. याठिकाणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी बैठक घेऊन भोंग्यांविषयी जनजागृती केली.
पिंपरी-चिंचवडच्या नेहरू नगर परिसरात काही फुटांवर मशीद, हनुमान मंदिर, साई मंदिर आणि महादेव मंदिर अशी धार्मिक प्रार्थनास्थळे आहेत. दोन्ही धर्मातील नागरिकांना अजान, आरतीचा कधीच त्रास झाला नाही. मात्र, मनसेच्या आंदोलनानंतर भोंग्याचा विषय पुढे आला असून परवानगी घ्यावी लागत आहे. येथील तवकल्ला जामा मशीदीचे अध्यक्ष नजीर भाई म्हणाले की, पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही परवानगी काढणार आहोत, त्याबाबतचा अर्ज पोलीस ठाण्यात दिला आहे. सर्व अटी शर्थीचं पालन करणार आहोत. ४ मे पासून भोंग्यावरील अजान बंद आहे. पुढे ते म्हणाले की, येथील हिंदू बांधवांना भोंग्याचा कधीच त्रास झाला नाही, आम्ही त्यांच्या सणावाराला जातो. गेल्या ४० वर्षांपासून आम्ही इथं सलोख्यानं राहत आहोत.
हनुमान मंदिर ट्रस्टचे हृषीकेश भोसले म्हणाले की, मशिदीच्या भोंग्यापासून आम्हाला त्रास झाला नाही. त्यांनी परवानगी मिळावी म्हणून पोलिसांत अर्ज केलाय, त्यांना पोलिसांनी परवानगी द्यावी. भोंग्याबद्दल आम्ही एकमेकांच्या विरोधात कधी तक्रार केली नाही. उलट आम्ही एकमेकांच्या सणांमध्ये आनंदाने सहभागी होतो. भोंग्यावरील आरतीची आणि अजानची नागरिकांना सवय झाली होती. याचा कधी कोणाला त्रास झाला नाही, असंही त्यांनी म्हटलं.
दोन्ही समाजाच्या एकत्रित बैठकीत पोलीस काय म्हणाले? मशीद, हनुमान मंदिर, साई मंदिर आणि महादेव मंदिर हे सर्व धार्मिक प्रार्थनास्थळं शेजारी आहेत. संबंधित मंदिर आणि मशिदीच्या विश्वस्तांना बोलावून भोंग्यांविषयी जनजागृती करण्यात आली. भोंगा वाजवायचा असल्यास परवानगी घेणं गरजेचं आहे. तसेच आवाज मर्यादित ठेवावा लागणार आहे. नागरीवस्तीत दिवसा ५५ डेसीबेल तर रात्री ४५ डेसीबेल एवढा आवाज ठेवण्याची परवानगी दिली जाणार आहे, असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी बैठकीत सांगितलं.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
























Subscribe to my channel

