पुणे : खडकवासला धरणसाखळीतील चार धरणांमध्ये आतापर्यंत ९.९१ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा तब्बल दोन टीएमसीने कमी असल्याने पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. जलसंपदा विभागाकडून पुण्याला १५ जुलैपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. सध्या या चारही धरणांमध्ये मिळून एकूण ९.९१ टक्के म्हणजेच ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी ४ मेपर्यंत हा पाणीसाठा ४० टक्क्यांपेक्षा जास्त होता. ग्रामीण भागासाठी उन्हाळी हंगामासाठी ११ मार्चपासून सुरू करण्यात आलेले आवर्तन १० मेपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहे. या काळात सहा टीएमसी पाणी दिले जाणार आहे. त्यानंतर १० जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू केले जाणार असून या कालावधीत तीन टीएमसी पाणी दिले जाणार आहे. सलग ९० दिवस उन्हाळय़ात पिकांसाठी खडकवासला प्रकल्पातून पाणी देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दरम्यान, यंदा कडक उन्हाळा असल्याने प्रकल्पांमधील पाण्याचे जास्त बाष्पीभवन होत असून पाण्याची मागणीदेखील वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून पाणीचोरीतही वाढ झाली आहे, असे निरीक्षण जलसंपदा विभागाकडून नोंदविण्यात आले. पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणातही सध्या २.९७ टीएमसी म्हणजेच केवळ ३४ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येही काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या नऊ टीएमसी पाणी शिल्लक आहे. त्यातील पाच ते साडेपाच टीएमसी पाणी सिंचन आवर्तनासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला सोडण्याचे जलसंपदा विभागाचे नियोजन आहे. महापालिकेला प्रतिमहिना सव्वा ते दीड टीएमसी पाण्याची गरज आहे. धरणांमधील पाण्याचे बाष्पीभवन, पाणीगळती, पाणीचोरी आणि पाऊस लांबल्यास नियोजनानुसार काही पाणी राखीव ठेवण्यात येणार आहे. उपनगरांमध्ये नागरीकरणही मोठय़ा प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे महापालिकेला त्यापेक्षा अधिक पाणी घ्यावे लागत आहे. उच्च न्यायालयाने समाविष्ट २३ उपनगरांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत. शहरालगतच्या अन्य उपनगरांमध्येही खासगी टँकरने पाणी घेतले जात आहे. या बाबी लक्षात घेतल्या तर जलसंपदा विभागाला पाणीपुरवठा करताना कसरत करावी लागणार आहे.
शहर
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
- महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल! ४ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; विदर्भातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश!
- पुणे: मेट्रो स्थानकांवर रिक्षा आणि कॅब चालकांच्या दादागिरीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप.
महाराष्ट्र
- चिपळूण लाचप्रकरण: गरोदर महिलेकडून लाच घेणाऱ्या 'त्या' महिला डॉक्टरची नोकरी धोक्यात! निलंबनाचा प्रस्ताव दाखल, आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू!
- मुंबईत पुन्हा 'बेस्ट'चा थरार! कांदिवलीत इलेक्ट्रिक बसच्या धडकेत २ जण गंभीर जखमी, अपघाताचा भयानक व्हिडिओ CCTV मध्ये कैद!
- महाराष्ट्रात प्रशासकीय फेरबदल! ४ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; विदर्भातील अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या, तात्काळ पदभार स्वीकारण्याचे आदेश!
- पुणे: मेट्रो स्थानकांवर रिक्षा आणि कॅब चालकांच्या दादागिरीमुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप.
गुन्हा
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- पनवेल: लग्नाच्या तगाद्यातून प्रेयसीची हत्या करून मृतदेह जाळला; दोन महिन्यांनी प्रियकर अटकेत.
- नवी मुंबई: धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न; हिंदू देव-देवतांचा अपमान केल्याप्रकरणी नर्सवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल!
- पुणे: सचिन गायवळ फरारी असतानाही 'फेस टाइम ॲप'द्वारे भावाशी संपर्क; गुन्हे शाखेने जप्त केले ४ मोबाईल आणि लॅपटॉप.प्रकरणाचा
राजकीय
- कर्नाटकच्या राजकारणात मोठा भूकंप! डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होताच पक्षात बंडाळी; असंतुष्ट नेते दिल्लीला रवाना
- कोल्हापुरात 'शक्तीपीठ महामार्गा'वरून राजकीय ठिणगी; सतेज पाटील आणि राजेश क्षीरसागर आमनेसामने!
- तृणमूल काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; २० खासदार 'नॉट रिचेबल', गुप्त बैठका आणि संभाव्य फुटीच्या चर्चांनी ममता बॅनर्जींची चिंता वाढली.
- पंजाब भाजपमध्ये मोठी खळबळ; प्रदेशाध्यक्षपदी के.एस. ढिल्लों यांच्या नियुक्तीनंतर सरचिटणीस डॉ. जगमोहन सिंग राजू यांचा राजीनामा.
इतर
- एफडी (FD) धारकांसाठी मोठी बातमी! आता बँकांना दररोज जाहीर करावे लागणार व्याजदर; आरबीआयचा पारदर्शकतेवर भर
- आजचे राशीभविष्य: मंगळाच्या कृपेने या राशींना होणार धनलाभ, मालमत्ता खरेदीचे योग!
- एसटीचा प्रवास आता अधिक हायटेक! सवलतीसाठी 'एनसीएमसी' स्मार्ट कार्ड अनिवार्य, तर बसस्थानकांच्या २०० मीटर परिसरात अवैध वाहतुकीवर बंदी!
- रोज सकाळी जिरे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की अपायकारक? डॉक्टरांनी सांगितली सत्यता.
मनोरंजन
- टीम इंडिया मुल्लांपूरमध्ये दाखल: अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्याची तयारी, गिलच्या सहभागावर प्रश्नचिन्ह!
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
विडियो गॅलेरी

देश विदेश
- महाराष्ट्र: पुणे मनपा, विधान भवन आणि आरएसएस मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 'खलिस्तान नॅशनल आर्मी'च्या नावाने आला ईमेल.
- ओमान-गुजरात सब-सी गॅस पाइपलाइन: होर्मुझवरील अवलंबित्व संपवून भारताची ऊर्जा सुरक्षा बळकट करणारा एक ऐतिहासिक प्रकल्प!
- लग्नापूर्वीचे शारीरिक संबंध म्हणजे चारित्र्यावर डाग नव्हे; सर्वोच्च न्यायालयाची अत्यंत महत्त्वपूर्ण टिप्पणी!
- काश्मीर: जोजिला बोगद्याचा ऐतिहासिक टप्पा गाठला! काश्मीर ते लडाख आता वर्षभर राहणार जोडलेले; 'ब्रेकथ्रू' पूर्ण.

























Subscribe to my channel



