Mumbai Local Horror: 22-Year-Old Stabbed to Death Over Trivial Argument About Train Door

मुंबई लोकलमध्ये रक्तरंजित थरार! दरवाजा बंद करण्यावरून झालेल्या वादात २२ वर्षीय तरुणाची हत्या; आरोपीला फाशीची मागणी

Mumbai Local Horror: 22-Year-Old Stabbed to Death Over Trivial Argument About Train Doorमुंबईकरांची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि रक्तरंजित घटना घडली आहे. मुसळधार पावसामुळे लोकल ट्रेनच्या डब्याचा दरवाजा बंद ठेवायचा की उघडा, या किरकोळ कारणावरून झालेल्या वादात २२ वर्षीय तरुणाचा बळी गेला आहे.

 

 

नेमकी घटना काय?

मंगळवारी रात्री चर्चगेट-नालासोपारा फास्ट लोकल ट्रेन अंधेरी आणि बोरीवली दरम्यान असताना ही घटना घडली. मृताचे नाव मयंक लोहार असे आहे. मयंक ट्रेनच्या फर्स्ट क्लास डब्यात प्रवास करत होता. याच दरम्यान एका दुसऱ्या प्रवाशासोबत दरवाजा बंद करण्यावरून त्याचा वाद झाला. हे वाद इतके विकोपाला गेले की, संतापलेल्या आरोपीने आपल्याकडील धारदार चाकू काढला आणि मयंकच्या पोटावर वार केले.

उपचारादरम्यान मृत्यू:

हल्ल्यानंतर आरोपी बोरीवली स्थानकात ट्रेन येताच पळून गेला. घटना समजताच रेल्वे पोलीस (GRP) आणि रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) तातडीने मयंकला डब्यातून बाहेर काढले आणि बोरीवली स्थानकावरील आपत्कालीन वैद्यकीय कक्षात नेले. त्यानंतर त्याला तातडीने कांदिवली येथील शताब्दी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी अंत झाला.

कुटुंबीयांची मागणी:

या घटनेमुळे मयंकच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुलाच्या हत्येने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे आरोपीला त्वरित अटक करून त्याला फाशीची शिक्षा देण्याची आर्त मागणी केली आहे. सध्या पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीवरून आरोपीचा शोध घेत आहेत.



महाराष्ट्र

गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *