The Rotary Club of Pimpri celebrated its Golden Jubilee Installation Ceremony with great enthusiasm.

पिंपरी: रोटरी क्लब ऑफ पिंपरीचा सुवर्ण महोत्सवी पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

The Rotary Club of Pimpri celebrated its Golden Jubilee Installation Ceremony with great enthusiasm.पिंपरी: रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या पदग्रहण समारंभाचा सोहळा रविवारी (दि. 21 जून 2026) चिंचवड येथील रोटरी कम्युनिटी सेंटरमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

या वेळी क्लबचे नूतन अध्यक्ष श्री बाबा भापकर यांनी माजी अध्यक्ष श्री आनंद संपत यांच्याकडून पदभार स्वीकारला. तसेच नव्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. यामध्ये श्री सिद्धार्थ बोस यांची सचिवपदी, तर श्री प्रतीक पारेख यांची खजिनदारपदी नियुक्ती करण्यात आली. याशिवाय इतर संचालक मंडळ सदस्यांचीही निवड करण्यात आली.

नूतन अध्यक्ष श्री बाबा भापकर हे माजी पोलीस सहआयुक्त श्री सोपानराव भापकर यांचे सुपुत्र आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना त्यांनी सुवर्ण महोत्सवी वर्षात विविध समाजोपयोगी उपक्रम, कौशल्य विकास योजना आणि सामाजिक बांधिलकी जपणारे प्रकल्प राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे सांगितले. तसेच आजी-माजी सदस्यांच्या सहकार्याने हे सुवर्ण वर्ष संस्मरणीय करण्याचा निर्धारही व्यक्त केला.

कार्यक्रमाला क्लबचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री प्रमोद बाकरे, श्री धनंजय भिंगे, डॉ. विभा जुत्शी, श्री समीर रासने आणि श्री लोकेश जैन यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच उद्योजक व सदस्य श्री राजेंद्र भोसले, श्री संदीप डांगे, श्री संतोष गिरंजे, श्री अभिजित शिंदे आणि श्री रोहन रोकडे यांनीही उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

 

समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले भावी प्रांतपाल श्री चारू श्रोत्री यांनी रोटरीच्या सेवा परंपरेचा गौरव करत सामाजिक कार्यात अधिकाधिक योगदान देण्याचे आवाहन केले.

यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट 3131 मधील श्री संजय कारवा, डॉ. परवेज, सौ. अस्मिता पाटील, श्री योगेश गायकवाड आणि श्री भालचंद्र लेले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री कुशल शहा आणि सौ. ख्याती शहा यांनी प्रभावीपणे केले. पदग्रहण समारंभानंतर उपस्थितांनी सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी शुभेच्छा देत आगामी सामाजिक उपक्रमांना यश लाभो, अशी अपेक्षा व्यक्त केली.



महाराष्ट्र

गुन्हा

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *