मुंबई : राणा यांच्या घराबाहेर आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांची पोलिसांकडून धरपकड

मुंबई : राणा दांपत्यांच्या खार येथील घराबाहेर निदर्शने करणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे. या प्रकरणामध्ये आतापर्यंत ६ ते ७ जणांची ओळख पटली असून ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवणीत राणा आणि रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिल्यामुळे शुक्रवारपासून राणा दाम्पत्य विरुद्ध शिवसेना सुरु असलेला वाद काल टोकाला पोहचला. पोलिसांनी राणा दांपत्यांवर कलम १५३ (अ) अंतर्गत दोन समुदायांमध्ये तेढ निर्माण होईल असे वर्तन केल्याचा गुन्हा नोंद केला होता.

दरम्यान, राणा यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात असताना ज्या शिवसैनिकांनी पोलिसांच्या गाडीवर, चपला, बाटल्या फेकल्या होत्या. त्यांना पकडायला पोलिसांनी सुरुवात केली आहे.

तसंच तर किरीट सोमय्याच्या गाडीवर दगड मारणाऱ्या व्यक्तींचा शोधही पोलिसांनी सुरू केला आहे. गाडीवर बाटल्या चप्पल फेकण्याचे प्रकारही समोर आले असून त्याचे व्हिडिओही सोशल मीडिया आणि माध्यमातून व्हायरल झाला आहे. पोलीस ठाणे परिसरातच ही घटना घडली असून पोलिस ठाणे परिसरातील cctv  तपासून आरोपींची ओळख पटवण्याचे काम करत असून गरज पडल्यास पोलिस माध्यमांचेही फूटेजही तपासण्याची शक्यता आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *