Mumbai : तुरुंगवास टळला, पण शिक्षा कायम; माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा की धक्का? कोर्टात नेमकं काय घडलं

Mumbai : माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांना हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांना कोर्टाकडून १ लाखांचा जामीन मंजूर झाली आहे. कोर्टाने जामीन मंजूर झाल्याने त्यांची तात्पुरती अटक टळली आहे. हायकोर्टाच्या निकालानुसार कोकाटे यांना २ वर्षांची जेल होणार नाही,अशी माहिती हाती आली आहे. त्यामुळे कोकाटे यांना आज तात्पुरती दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

माजी मंत्री कोकाटे यांना आज शुक्रवारी एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आल्याने त्यांना अटक होणार नाही. त्यामुळे लिलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोकाटे यांच्यासाठी दिलासा मानला जातोय. मुंबई हायकोर्टात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायाधीशांनी हा महत्वपूर्ण निकाल दिलाय.

सदनिका घोटाळा प्रकरणा नाशिक पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागलं होतं. मात्र, कोकाटे यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याने त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांना दिलासा मिळाल्याने नाशिक पोलीस काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हायकोर्टाकडून माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर केल्यामुळे आता नाशिक पोलीस परत जाणार आहेत. मात्र, काही तांत्रिक बाबींची पूर्तता करून पोलीस नाशिकला परत जाणार आहेत.

मुंबई हायकोर्टात कोकाटेंच्या याचिकेवर दोन्ही बाजूने युक्तिवाद झाला. यावेळी सदनिका घोटाळा प्रकरणात कोकाटे आर्थिक मुद्द्यावरून सदनिकेसाठी पात्र होते, असा युक्तिवाद ॲड. रवींद्र कदम आणि ॲड. अनिकेत निकम यांनी केला होता. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर निकालाचं वाचन झालं. यावेळी लिलावती रुग्णालयात अँजिओग्राफी झालेल्या कोकाटे यांना दिलासा मिळाला. त्यांना १ लाखांच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर झाला. तर त्यांची या प्रकरणात आमदारकी देखील जाणार नाही. आमदारकी रद्द करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेतील, असं कोर्टाने म्हटलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *