पुणे - घरगुती व व्यावसायिक सिलेंडरमधून (Cylinder) अवैधपणे दुसऱ्या सिलेंडरमध्ये चोरुन गॅस (Gas) भरुन त्याची बाजारामध्ये विक्री (Selling) करणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकाने अटक (Arrested) केली. पोलिसांनी त्यांच्याकडून भरलेले व रिकामे सिलेंडर जप्त करीत गॅस चोरी करणारे रॅकेट उघडकीस आणले.
जयकिसन मियाराम बिष्णोई (वय 27), जगदिश नारायणराम बिष्णोई (वय 27) व जगदिश नारायण बिश्नोई (वय 27, तिघेही रा. उरूळी देवाची, मुळ रा. जोधपुर, राजस्थान) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैधरित्या घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून गॅस चोरी करून लहान सिलेंडरमध्ये भरताना लागलेल्या आगीमध्ये 22 सिलेंडरचा स्फोट झाला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी काही जणांना अटक केली होती. या पार्श्वभुमीवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गॅसचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या पथकांकडून गॅस चोरी करणाऱ्यांचा शोध घेतला जात होता. दरम्यान, उरुळी कांचन परिसरात काही जण घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी करुन ते अन्य सिलेंडरमध्ये भरून त्याची बाजारात विक्री करीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनीट दोनच्या पथकास मिळाली होती.
उरूळी देवाची येथील वज्रेश्वरी देवी मंदिराच्या मागील बाजुच्या परिसरातील एका गोदामामध्ये संशयित आरोपी नळीद्वारे अवैधपणे गॅस सिलिंडरची विक्री करीत असल्याची खबलर पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार, पोलिसांनी संबंधित ठिकाणी पाहणी केली, त्यावेळी तेथील एका बंगल्यामध्ये तिघेजण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पोलिसांच्या निर्दनास आले. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास तेथे छापा टाकून तिघांना अटक केली. तिघेजण एका घरोघरी सिलेंडर पोचविण्याचे काम करतात.
त्यांच्याकडून एकूण 31 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले. यावेळी तिघांकडून 19 किलोचे 31 गॅस सिलेंडर, भारत कंपनीचे 26, एचपी कंपनीचे 5 गॅस सिलेंडर, 5 किलोचा एक रिकामा सिलेंडर असा 53 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याबरोबरच वायगंडे यांच्या घरासमोरील मोकळ्या जागेतील बंद पडलेल्या तीन चाकी टेम्पोमध्ये सहा रिकामे सिलिंडर सापडले.
याप्रकरणी पोलिसांनी तहसील कार्यालयास माहिती कळवून आरोपींनी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना नऊ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सहाय्यक पोलिस आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, पोलिस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सहायक पोलिस उपनिरीक्षक यशवंत आंब्रे, पोलिस कर्मचारी अस्लम पठाण, संजय जाधव यांच्या पथकाने हि कारवाई केली.
शहर
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- गॅस सिलेंडर पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयची कमाई किती? एजन्सीला मिळणाऱ्या कमिशनचे संपूर्ण गणित!
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
महाराष्ट्र
- एका अपघाताचा थरार पाहत असतानाच काळाने घातला घाला! रत्नागिरीत रिक्षा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दाम्पत्याला डंपरची चिरडले; विवाहितेचा मृत्यू.
- रत्नागिरीत महायुतीतील जुगलबंदी! एमआयडीसी परिसरात भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले; राड्यात अनेकजण जखमी.
- नागपुरात आता कचरा फेकणाऱ्यांची खैर नाही! नाल्यांत आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर थेट FIR दाखल होणार.
- पुरोगामी कोल्हापूरला काळिमा! गुप्तधनाच्या लालसेपोटी अघोरी पूजा आणि काळ्या जादूचा बाजार; भोंदूगिरीचे वाढते पेव.
गुन्हा
- सेल्फीचा थरार की नियोजित घातपात? शाही लग्नाआधी केतन अग्रवालचा संशयास्पद मृत्यू; होणाऱ्या पत्नीला अटक!
- पुणे: पुन्हा गोळीबाराचा थरार! कात्रज-मंतरवाडी बायपासवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी झाडल्या ४ गोळ्या.
- उत्तर प्रदेश: कौटुंबिक वादातून सख्ख्या भावाचा क्रूर अंत; भाऊ, भावजय आणि पुतण्याची निर्घृण हत्या!
- मुंबई: कल्याण मध्ये १५ वर्षीय मुलीवर आजोबांच्या वयाच्या दोघांकडून अत्याचार; दोन नराधमांना अटक!
राजकीय
- उद्धव ठाकरेंना शिवसेनेचे ६ खासदार शिंदे गटात; 'ऑपरेशन टायगर' यशस्वी!
- कोल्हापूर: कोल्हापूर-पुण्याला ३ हजार कोटींची भेट; अमित शहा यांची इचलकरंजीत मोठी घोषणा!
- अमित शहांचा कोल्हापुरात उद्धव ठाकरेंना थेट टोला! एकनाथ शिंदेंचा उल्लेख थेट 'शिवसेना प्रमुख' म्हणून केल्याने राजकीय चर्चांना उधाण
- 'ऑपरेशन टायगर'चा पहिला फोटो समोर! पंचतारांकित हॉटेलमध्ये लपलेत बंडखोर खासदार; समोर बसलेली ती 'मोठी व्यक्ती' कोण?
इतर
- छत्रपती संभाजीनगरच्या अन्न प्रयोगशाळेत ढिगाऱ्याखाली तपासणी! कर्मचारी कमतरता आणि नादुरुस्त AC मुळे ४ हजार नमुने प्रलंबित.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!
- दैनिक राशिभविष्य २३ जून २०२६: आज कोणाचे नशीब चमकणार? जाणून घ्या तुमची रास काय सांगते!
- आजचे राशिभविष्य (२२ जून २०२६): कोणत्या राशींवर होणार महादेवाची कृपा? जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल!
मनोरंजन
- 'इन्स्पेक्टर मंजू'वर प्रेमाचा वर्षाव! गावकऱ्याकडून सई सुतारला मिळाले सोन्याचे गिफ्ट, व्हायरल व्हिडिओने जिंकली मने.
- 'वेलकम टू द जंगल'चा ट्रेलर प्रदर्शित: अक्षय कुमार आणि सुनील शेट्टीची 'हेरा फेरी' स्टाईल धम्माल पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला!
- 'अल्फा' चित्रपटात आलिया भट्टच्या लहानपणीची भूमिका साकारणारी ही 'मराठमोळी' चिमुरडी आहे तरी कोण? जाणून घ्या खुशी हजारेबद्दल!
- 'आली लखाबाई' गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ; अमृता धोंगडेच्या रौद्र रूपाने आणि दमदार नृत्याने प्रेक्षकांना केले मंत्रमुग्ध.
देश विदेश
- अमेरिकेचे नागरिकत्व होणार आता महाग! ट्रम्प प्रशासनाचा ७५% शुल्कवाढीचा प्रस्ताव; गरिबांसाठीची सवलतही रद्द.
- लव्ह मॅरेजनंतर पतीने केला दुसरा विवाह; न्यायासाठी चिमुरड्या मुलासह माय माऊली चढली मोबाईल टॉवरवर!
- भारताची जागतिक भरारी! जहाज पुनर्वापर (Ship Recycling) क्षेत्रात भारत जगात प्रथम क्रमांकावर, २०२५ मध्ये ३५.४ टक्के बाजार हिस्सा.
- ॲनालॉग की अस्सल पनीर? फसवणूक टाळण्यासाठी 'या' सोप्या ट्रीक्स वापरून ओळखा भेसळयुक्त पनीर!


























Subscribe to my channel

