सासवडचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र जगताप यांचे निधन

सासवड : पुरंदर तालुका भाजपचे माजी अध्यक्ष आणि सासवड (ता. पुरंदर) नगरीचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र नारायणआप्पा जगताप ऊर्फ आर.एन.भाऊ (वय ५६) यांचे आज मध्यरात्री प्रदिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगे कौशिक, मयूर, दोन बहिणी असा परिवार आहे. सासवडचे विद्यमान नगरसेवक संजय गणपत जगताप यांचे ते चुलत बंधू होत. 1992 - 93 मध्ये ते सासवड नगरपालिकेवर निवडून आले होते. त्यावेळी पंचवार्षिकच्या पहिल्याच वर्षी त्यांना नगराध्यक्षपद मिळाले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे या पक्षातही त्यांनी तत्पूर्वी काम केले होते. निधनानंतर सासवड येथे कर्हा नदीकाठी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी बहुसंख्य विविध क्षेत्रातील नागरिक उपस्थित होते. मान्यवर नेते व पदाधिकाऱ्यांनी श्रध्दांजली अर्पण केली.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *